म्यानमारमध्ये भूस्खलनात ११० जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020
Total Views |
Myanmar_1  H x



यंगून - म्यानमारच्या कचिन प्रांतातील एका खाणीत मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी भूस्खलन झाले. यात ११० लोकांचा मृत्यू झाला. तसेच आणखी काही नागरिक दबले असल्याची भीतीही व्यक्त केली जाता आहे. या प्रकरणी स्थानिक वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अडीचशे फूट उंचीवर हे मजूर काम करत होते.




काहींचा मृत्यू हा बुडल्याने झाला आहे. खाणीनजीक पाऊस पडू लागल्याने पाणी भरले होते. जिल्हा प्रशासक यू क्वॉ मिन यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण दोनशे जणांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. गेल्या आठवडभर इथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. गतवर्षीही ऑगस्टमध्ये दक्षिण पूर्व म्यानमारमध्ये भूस्खलनात ५९ लोकांचा मृत्यू झाला होता. यावेळीही मुसळधार पावसामुळेच भूस्खलन झाले होते. त्या वर्षी झालेल्या पावसामुळे इथे ८० हजार लोक बेघर झाले होते.






@@AUTHORINFO_V1@@