महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020
Total Views |

sanjay oak_1  H



श्वसनास त्रास झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल; कोरोना चाचणी सकारात्मक 

मुंबई : महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोना संसर्ग झाला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्याने डॉ. ओक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड१९ चाचणी सकारात्मक आली. त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील फोर्टिस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.


डॉ. संजय ओक यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिल्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.


राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी गठित करण्यात आलेल्या कोरोना टास्क फोर्समध्ये नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. या टास्क फोर्समार्फत वेळोवेळी सरकारला सूचना देण्यात येत आहेत. टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून संजय ओक संपूर्ण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. संजय ओक हे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊनही स्थितीचा आढावा घेत होते. यादरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली.



@@AUTHORINFO_V1@@