रक्त उसळायलाच हवं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020   
Total Views |
Jawan request to boycott


 
 

आपला देश इतका मोठा... मग चीनवर वचक कसा ठेवणार? आपण तर इतक्या चिनी वस्तू वापरतोय, मग त्यांच्यावर आपण वर्चस्व कसे मिळवणार? त्यांचा जीडीपी इतका आणि आपण तर कुठच्या कुठे, असा प्रश्न विचारणार्‍या प्रत्येकासाठी...


‘लॉकडाऊन’ किंवा त्यापूर्वीपासून आपण किराणा माल किंवा अन्य वस्तू दुकानातून विकत घेतो. काही जण बर्‍याच वर्षांपासून कदाचित त्या एकाच दुकानातून वस्तू खरेदी करत असतीलही. त्या दुकानदाराशी आपले फार जुने संबंधही असतीलही. पण, म्हणून आपण त्याला घरात घुसखोरी करायला देऊ का? समजा, तो घरी काही कारण सांगून आलाही, तरी फारफार तर तास-अर्ध्या तासाने तो जाण्याची वाट आपण पाहायला लागतोच ना? की त्याचे आपल्यावर फार उपकार आहेत, म्हणून त्याला आपल्या सोसायटीत, अंगणात, आवारात, घरात बस्तान मांडायला देऊ? अर्थातच नाही! मग हा देश आपला काहीच लागत नाही का? असे नाही ना, मग या देशाची काळजी आपल्या घराप्रमाणे आपण कधी घेणार?



चिनी अ‍ॅप्स किंवा वस्तूंवर बंदी घालून भारताला काय मिळणार, असे प्रश्नव विचारणारेही आपल्याकडे बरेच आहेत. चिनी मालावर बहिष्काराची भाषा केल्यावर कुत्सित हसणार्‍यांचाही एक गटही त्यातलाच. आपण चिनी वस्तूंनी वेढलेलो आहोत, हे मान्यच. मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रात असलेला चिनी वस्तूंचा शिरकाव हा मी एकटा कसा रोखणार? हे तर सरकारचे काम आहे ना. याला मी काय करू शकतो, असा प्रश्न विचारून हतबलता दाखवणार्‍यांचाही एक गट आहे. या सगळ्यांसाठी एक प्रश्न उभा राहतो, या गोष्टी काय मोफत चीनने दिल्या का? चीनने वस्तू देऊन आम्हाला गुलाम बनवले का? नाही ना, मग त्याच्याविरोधात देश म्हणून आवाज उठवणे चुकीचे कसे ठरु शकते?



आज भलेही सर्व चिनी वस्तूंना पर्याय उपलब्ध नाहीत. पण, हा तोच भारत आहे, ज्याने कोरोनाच्या संकटात विविध देशांना सर्वतोपरी मदत पोहोचवली. संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. किंबहुना, चीनच नव्हे तर ज्या ज्या देशांना औषधांची गरज भासली तिथे आपण मदत पोहोचवणारा आपला देश... लोकसंख्येत जगात दुसरा, सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश, जास्तीत जास्त डिजिटल बाजारपेठाही आपल्याच देशात, नैसर्गिक संसाधने, क्षेत्रफळ, विज्ञान-तंत्रज्ञान कुठल्याही क्षेत्रात आपण मागे नाही आणि असू तर तिथवर पोहोचण्याचा प्रयत्न करण्याची जिद्द आणि अफाट विश्वास देशवासीयांमध्ये कायम आहे.



एक साधे उदाहरण घेऊ, ‘पीईपी किट्स’ ही गोष्ट भारतात कोरोना महामारीपूर्वी कधीच तयार केली जात नव्हती. आजतागायत या किट्स आपण भारतातील वैद्यकीय सेवा देणार्‍यांसाठी आयात केली जात होती. मात्र, ‘लॉकडाऊन’च्या काळात आपला देश जगात ‘पीईपी किट्स’ बनवणारा जगातील दुसरा देश बनला आहे, हा आपला विजयच आहे. ज्या ज्या वेळी गरज होती, तेव्हा तेव्हा भारतीयांनी आपले प्रभुत्व जगाला सिद्ध करून दाखवले आहे. चीन जगाशी जैविक युद्ध खेळत आहे, शेजारील देशांना कोरोनाच्या संकटात मदत करण्याऐवजी सीमेवर लष्करी ताकद दाखवून घुसखोरी करू पाहत आहे. इतकेच नव्हे तर ज्या भारत-नेपाळच्या मैत्रीच्या गाथा इतकी वर्षे आपण ऐकल्या, त्याच मित्रराष्ट्राला भारताविरोधात चीनने चिथावणी दिली. सीमेवरून जेव्हा एक जवान तळमळीने देशवासीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतो, त्यावेळेसही आपले रक्त उसळत नाही का?




एक शेवटचे उदाहरण पाहू, नेपाळने भारताचा भूभाग त्यांच्या नकाशात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालमध्ये व्यापार्‍यांनी एकजूट दाखवत नेपाळला कुठल्याही प्रकारचा माल पाठवणार नाही, असा ठाम निर्णय घेतला. सोबत सरकारलाही आवाहन केले की, भारत सरकारने नेपाळला केली जाणारी निर्यातही रोखावी. तेव्हा, सुरुवात स्वतःपासून करुयात. ‘कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उच्छालो यारों...!’




@@AUTHORINFO_V1@@