देशात श्रध्देला मोल नाही..गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी ? : आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020
Total Views |


ashish shelar_1 &nbs

 



मुंबई :
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत आरोग्यत्सव साजरा करणार असल्याची माहिती काल मंडळाकडून देण्यात आली. मात्र मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये
, असे मत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले.




''
लालबागचा राजा' गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्यच. पण मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची हीच ती वेळ”!, असे आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढे ते म्हणतात, “'संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शनसुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रद्धेला मोल नाही.. श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही...म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?”, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.




'सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय..पण बाप्पा मार्ग काढेल ! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मुर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार.. त्यांचे कौतुकच!' असेही शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


@@AUTHORINFO_V1@@