चीनविरोधी लढाईसाठी भारतीय हवाईदलाच्या पंखात नवे बळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2020
Total Views |


india_1  H x W:


रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करण्याची संरक्षण मंत्रालयाची घोषणा


नवी दिल्ली : चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासाठी १८ हजार १४८ कोटी रुपये लागणार असल्याचे सांगण्यात आले.


या डीलनुसार भारत रशियाकडून सुखोई-३० आणि मिग-२९ ही लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. ही एकूण ३३ लढाऊ विमाने असणार असून यामध्ये १२ सुखोई-३० आणि २१ मिग-२९ विमाने आहेत. याशिवाय भारताकडे असलेल्या रशियन लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे. ही मिग २९ची ५९ विमाने आहेत. संरक्षण मंत्रालयाने २४८ अतिरिक्त एअर मिसाईल खरेदी करण्याचीही परवानगी दिली आहे. ही मिसाईल भारतीय हवाई दल आणि नौदलाला वापरता येणार आहे. शिवाय डीआरडीओद्वारे विकसित एक हजार किमी रेंजच्या क्रूज मिसाइलच्या प्रारुपालाही परवानगी देण्यात आली आहे.


रशिया हा भारताचा सर्वात मोठा संरक्षण सामुग्री पुरवठादार देश आहे. शितयुद्धाच्या काळात रशिया हा कायम भारताच्या पाठिशी उभा राहिला आहे. त्यामुळे चीनचा विरोध असतानाही रशिया भारताला संरक्षण सामुग्री द्यायला तयार आहे. या आधी भारताने फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमाने खरेदी केली होती. भारताकडे सध्या मिग-२९ ही विमाने आहेत. मात्र ती आता जुनी झाली आहेत. त्यांच्या अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. नवी विमाने अपग्रेडेड असून ती अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज आहेत.


डिफेंस एक्जिबिशन काउंसिलने ३८९०० कोटींच्या प्रस्तावांना मान्यता दिली असून त्यापैकी ३११३० कोटी रुपये भारतीय उद्योगांकडून अधिग्रहित केले जातील. पिनाका रॉकेट लॉन्चर, बीएमपी कॉम्बॅट व्हेइकल अपग्रेड आणि लष्करासाठी सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओ यांनाही मान्यता देण्यात आली आहे.


@@AUTHORINFO_V1@@