ट्रम्प यांचे अनोखे प्रचारतंत्र ; 'टेलिफोनिक रॅली'तुन साधतायेत संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2020
Total Views |

donald trump_1  



वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणूक सभा रद्द केल्या आहेत. या सभांऐवजी ते आता मतदारांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधतील. याला 'टेलीफोनिक-रॅली' किंवा 'टेली-रॅली' असे संबोधण्यात येत आहे.कोरोनाचे वाढते संक्रमण आणि वारंवार चहूबाजूंने टीका झाल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्प वारंवार कोरोनाबाबत घालून दिलेले प्रोटोकॉल तोडत असल्याची टीका त्यांच्यावर होत होती. पण, आता ते बॅकफूटवर येत असल्याचे अलीकडेच त्यांनी मास्क वापरल्यानांतर दिसून येतेय.



ट्रम्प म्हणाले, अमेरिकाकडे जगातील सर्वोत्कृष्ट चाचणी कार्यक्रम


शुक्रवारी विस्कॉन्सिन येथे झालेल्या पहिल्या टेली रॅलीत ट्रम्प म्हणाले, “मला तुमच्यासोबत रहायचे आहे. आम्ही लस बनवण्याच्या आणि एक उपचार शोधण्याच्या दिशेने खूप चांगले काम करत आहोत. परंतु, जोपर्यंत या समस्येचे निराकरण होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रॅली करणे कठीण होईल, म्हणून मी दूरध्वनीच्या माध्यमातून रॅली करीत आहे. आम्ही या रॅलीला ट्रम्प रॅली देखील म्हणू शकता, पण आम्ही संवाद दूरध्वनीद्वारे करू. ”ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोरोनाव्हायरस चाचणी कार्यक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम कार्यक्रम आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५करोडहुन अधिक लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@