राम मंदिर बांधून कोरोना जाईल, असं काहींना वाटतं : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2020
Total Views |

Sharad  Pawar_1 &nbs

सोलापूर : "काही लोकांना असं वाटतं की, राम मंदिर बांधल्यामुळे कोरोना जाईल, त्यामुळे मंदिर उभारणे हे त्यांच्यासाठी प्राध्यान्यक्रम असेल. परंतू आम्हाला आणि आमच्या सरकारला फक्त आणि फक्त कोरोना हीच पहिली समस्या आहे, त्याविरोधातच आम्ही सध्या लढत आहोत," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत केले आहे. 
पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शरद पवारांनी अशा प्रकारची विधाने करत राजकीय कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. राम मंदिर बांधणार असाल तर मशिदीसाठीही परवानगी द्या, असे म्हणत त्यांनी वादाला तोंड फोडले होते. मात्र, पवारांच्या वक्तव्यापूर्वीच पाच एकर जागेत मशिदीसाठीही समिती तयार होणार असल्याचेही त्याच वेळी उघड झाले होते. 
शरद पवार म्हणाले, "आमच्यासाठी कोरोना ही सध्या प्रार्थमिकता आहे. मंदिर बांधणे नाही, काहीजणांना वाटते की, मंदिर बांधल्याने कोरोना जाईल, त्यामुळे त्यांचा इतके महत्वा या गोष्टीला दिले जात असावे." शरद पवार रविवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रवाना झाले आहेत.


@@AUTHORINFO_V1@@