गतवर्षी ५ ऑगस्टला कलम ३७० हटवले : यंदा राम मंदिर भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2020
Total Views |

Modi_1  H x W:


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात सर्वाधिक बहुमताने निवडून आलेल्या भाजपप्रणित सरकारसाठी ५ ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक असणार आहे. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राम मंदिर निर्माणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. 
या दिवसाला देशाच्या इतिहासात एक ऐतिहासिक महत्वही आहे. ५ ऑगस्ट या दिवसाची सध्या वेगळीही चर्चा आहे. गतवर्षी कलम ३७० रद्द करून गृहमंत्री अमित शहा यांनी हा निर्णय यशस्वी करून दाखवला होता. या वर्षी योगायोगाने राम मंदिर निर्माणाचाही मुहूर्त ५ ऑगस्ट असल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.



@@AUTHORINFO_V1@@