पायलट यांना आमंत्रण नाही, मात्र, आल्यास स्वागत : भाजप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2020
Total Views |

Sachin Pilot _1 &nbs



नवी दिल्ली : राजस्थानमध्ये राजकीय क्षेत्रातील उलथापालथीचा आजचा दहावा दिवसही आरोप प्रत्यारोपांमध्येच गेला. काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप सुरूच आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष सतीश पूनिया यानी अशोक गहलोत सरकार हे जुगाड सरकार चालवत असल्याचा टोला लगावला आहे. या सरकारने बहुमत गमावले आहे, आणखी काही आमदार राजीनामा देतील तर सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे.


ते म्हणाले, भाजप अविश्वास ठराव पारीत करणार नाही. आम्ही सर्व गोष्टी व घटनाक्रमांवर बारीक लक्ष ठेवून आहोत. विचार करूनच निर्णय घेऊ. सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता स्वतःहून त्यांना आमंत्रण देणार नाही. मात्र, त्यांचे कायम स्वागत आहे, असेही ते म्हणाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी रात्री राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेऊन, सरकारला 103 आमदारांच्या समर्थनाचा दावा करणारे पत्र सादर केले. सोबतच, त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची तयारीही दर्शवली.


गहलोत आणि राज्यपाल यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असे या बैठकीनंतर राजभवनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सूत्रांच्या मते, राज्यातील राजकीय स्थितीवरही त्यांच्यात चर्चा झाली. आपल्या सरकारला 103 आमदारांचा पािंठबा प्राप्त असून, येत्या बुधवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आपली इच्छा आहे, असेही गहलोत यांनी राज्यपालांना सांगितले.


सरकारला पाठिंबा देणार्‍या या 103 आमदारांमध्ये काँग्रेसचे 88 आमदार आहेत. याशिवाय एक अपक्ष, बीटीपीचे दोन, माकपचे दोन व राष्ट्रीय लोकदलाच्या एका आमदाराचा समावेश आहे. ही एकूण बेरीज 94 इतकी होत असली, तरी बंडखोरी करणारे काही आमदार परत येण्याचा दावा गहलोत यांच्या निकटच्या नेत्यांनी केला आहे. त्यांची नावेही या पत्रात असल्याचे सूत्रांनी सांगितले.




@@AUTHORINFO_V1@@