ट्विटरवर नमो नमो! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६ कोटी फॉलोअर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2020
Total Views |

Narendra Modi_1 &nbs




नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याची ट्विटरची आकडेवारी सांगत आहे. मोदींच्या एकूण फॉलोअर्सची संख्या सहा कोटींवर पोहोचली तसेच जानेवारी २००९ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत पाच कोटी फोलोअर्स असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या ट्विटर अकाऊंटला गेल्या नऊ महिन्यांत एक कोटी लोकांनी फॉलो केले आहे.



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर दोन कोटी १६ लाख फॉलोअर्स आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शाह यांनी मे २०१३ मध्ये ट्विटर अकाऊंट सुरू केले होते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही याच वेळी ट्विटर अकाऊंट सुरू केले होते. त्यांच्या फॉलोअर्सची एकूण संख्या १ कोटी ७८ लाख इतकी आहे.



राहुल गांधी पिछाडीवर

काँग्रेसचा चेहरा असणारे राहुल गांधी यांना पक्षातील युवा चेहरा मानला जात असतानाही ट्विटरवर त्यांना स्वतःची कमाल इतक्या वर्षांत दाखवता आलेली नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांचे ट्विटरवर १ कोटी ५२ लाख इतके फॉलोअर्स आहेत. दरम्यान, राहुल गांधी २०१५ मध्ये या सोशल मीडिया अकाऊंटशी जोडले गेले आहेत. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची ट्विटर फॉलोअर्स संख्या एक कोटींपेक्षा कमी आहे. 



ओबामा १२.९ कोटी तर ट्रम्प यांचे ८.३७ कोटी फॉलोअर्स

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे १२.९ कोटी फोलोअर्स आहेत. २०१९ सप्टेंबरमध्ये ही संख्या १०.८ कोटी इतकी होती. ट्विटरवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या ट्विटसाठी ओळखले जातात, त्यांचे एकूण ८.३७ कोटी इतके फोलोअर्स आहेत.



योगींचे १.०५ कोटी तर केजरीवाल यांचे २ कोटी फॉलोअर्स 

देशातील सर्वात मोठे राज्य मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटी पाच लाख इतकी आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांनी ट्विटर अकाऊंट सुरू केले. ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्यांपैकी एक नेते अरविंद केजरीवाल यांचे १ कोटी ९९ लाख फॉलोअर्स आहेत.







@@AUTHORINFO_V1@@