हॅकर्सने लक्ष केलेल्या ट्विटर खात्यांची माहिती भारत सरकारने मागविली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2020
Total Views |

twitter_1  H x



नवी दिल्ली :
एकाच वेळी १३० खाती हॅक झाल्यावर संपूर्ण जगाचे डोळे सध्या मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवरकडे लागले आहे. १५ जुलै रोजी हाय प्रोफाईल बिल गेट्स, बराक ओबामा, अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, उबर, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांच्यासह १३०हाय-प्रोफाइल ट्विटर अकाऊंटसना लक्ष्य केले गेले होते.



या हॅकिंगनंतर भारत सरकारच्या सायबर सिक्युरिटी एजन्सी सर्ट-इनने ( Cert-In) ट्विटरवरुन या हॅकिंगची माहिती मागितली आहे. या हॅकिंगमध्ये बळी पडलेल्या भारतीय वापरकर्त्यांविषयी माहिती देण्यासाठी एजन्सीने ट्विटरला सांगितले आहे. याव्यतिरिक्त, एजन्सीने ट्विटरवरुन वापरकर्त्यांविषयीही माहिती मागितली आहे, ज्यांनी या हॅकिंगनंतर ट्विटसह सामायिक केलेल्या लिंकला भेट दिली आहे, ट्विटरने अद्याप या संदर्भात भारत सरकारला प्रतिसाद दिलेला नाही.



दरम्यान, १५ जुलै रोजी बिटक्वाइन घोटाळ्यासाठी हॅकर्सनी बिल गेट्स आणि बराक ओबामा यासारख्या सेलिब्रिटींना लक्ष्य केले. बिल गेट्स यांच्या अकाऊंटवर हॅकरने लिहिले की, "प्रत्येकजण मला सांगत आहे की आता समाजाला परत देण्याची वेळ आली आहे, म्हणून मी आवाहन करतो की पुढच्या तीस मिनिटांत मला पाठविलेले पैसे मी दुप्पट करून परत करेल." आपण १०००डॉलर्सचा बिटकॉइन पाठवा मी २००० डॉलर परत करेन. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, या हॅकरने ३७३ व्यवहार केले आहेत ज्याद्वारे त्याला मिळाले उत्पन्न BTC १२.८६२५२५६२च्या आसपास आहे.
@@AUTHORINFO_V1@@