सोनू सूदची मुंबई पोलिसांना मदत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020
Total Views |

Sonu sood_1  H



गृहमंत्र्यांनी मानले सोनू सूदचे आभार!


मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या कठीण काळात पोलीस यंत्रणा रात्रंदिवस आपल्याला सेवा पुरवत आहे . यापार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूदने महाराष्ट्र पोलिसांसाठी तब्बल २५ हजार फेस शिल्ड दिल्या आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी सोनू सूदचे आभारही मानले आहेत.


अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोनू सूद आणि त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. “आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार फेस शिल्ड दिल्याबद्दल सोनू सूद यांचे आभार,” असे कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिले आहे. सोनू सूदच्या या कार्यांबद्दल अनेकांकडून त्याची स्तुतीही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही अनेक युझर्सनी त्याचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे सोनू सूदनेही तो फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “आपले पोलीस बांधव आणि भगिनी हे खरे हिरो आहेत. ते करत असलेल्या कार्यासमोर हे फारच कमी आहे,” असे तो म्हणाले.





मुंबईसह राज्यातील करोनचा प्रादुर्भाव वाढत असला तरी पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजवावेच लागते. अशावेळी करोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी पोलिसांना या फेस शिल्डचा मोठा उपयोग होणार आहे. दरम्यान, सोनू सूदने लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांसाठी घरी पोहोचवण्याचे कामदेखील केले होते.





@@AUTHORINFO_V1@@