आठवीच्या पुस्तकातील मोठी चूक ! भगतसिंह, राजगुरुंसह कुर्बान हुसेन यांना फाशी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020
Total Views |

पुणे : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचे अमूल्य योगदान आहे. हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. लहानपणापासून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या कार्याविषयी आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या हुताम्त्याविषयी शिकवले जाते. मात्र, सध्याच्या आठवी बालभारतीच्या पुस्तकामध्ये भगतसिंग, राजगुरु यांच्यासह सुखेदव यांच्याजागी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या या चुकीमुळे सोशल मिडीयावर अनेक जणांकडून राग व्यक्त करण्यात आला.
 
 
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतला आहे. सुखदेव यांचे नाव वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केली आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, यामुळे सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान झाला असून त्वरित ही सर्व पुस्तके मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
 
 
शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी यावर म्हंटले आहे की, “साधारण दहा वर्षानंतर पाठ्यक्रम बदलला जातो. मात्र लवकरच केंद्राची नवीन शिक्षण धोरण येणार आहे, त्यानंतर एनसीआरटीईच्या माध्यमातून याविषयी राज्य सरकार निर्णय घेणार आहे. तसेच सोलापूरच्या कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, मलप्पा जनशेट्टी आणि किसन सारडा या चार हुतात्म्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे यात मुस्लीम आणि हिंदू असा भेद करणे चुकीचे आहे.”
@@AUTHORINFO_V1@@