‘इसिस ब्राईड’ शमीमा बेगम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020   
Total Views |

shamima begum_1 &nbs


धर्माच्या नावावर अधर्माची आत्मियता असलेल्या शमीमाला क्रूर ‘इसिस’बद्दल आकर्षण निर्माण झाले. सीरियामध्ये जाऊन ‘इसिस’मध्ये सामील व्हायचे, या वेडापायी वयाच्या १५व्या वर्षी शमीमा आपल्या दोन मैत्रिणी अमिरा अबसे आणि कदिजा सुल्तानासोबत तुर्कस्तानमार्गे सीरियाला पोहोचली. तिथे तिला मूळचा नेदरलॅँड्सचा यागो रियेदिक भेटला.तो जन्माने इसाई होता, पण त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला.


स्वत:वर आलेल्या परिस्थितीचे मानवी मूल्यांवर तावूनसुलाखून विश्लेषण करणे; मात्र याच मानवी मूल्यांचे चिंतन ज्यावेळी इतरांबद्दल करावे लागते, त्यावेळी त्याची भूमिका कशी बदलते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शमीमा बेगम होय. शमीमा बेगमला ‘इसिस ब्राईड’ अशी कुख्यातीही आहे. शमीमा आणि ब्रिटन, बांगलादेश, नेदरलॅँड्स सध्या यामुळे चर्चेत आहे. शमीमा लंडनच्या ब्रेथेल ग्रीनमध्ये आई-वडिलांसोबत राहायची. धर्माने मुस्लीम असलेल्या शमीमाच्या आईवडिलांची मूळ मायभूमी आहे बांगलादेश. संपन्न घर, कसलीच ददात नाही. मात्र, धर्माच्या नावावर अधर्माची आत्मियता असलेल्या शमीमाला क्रूर ‘इसिस’बद्दल आकर्षण निर्माण झाले. सीरियामध्ये जाऊन ‘इसिस’मध्ये सामील व्हायचे, या वेडापायी वयाच्या १५व्या वर्षी शमीमा आपल्या दोन मैत्रिणी अमिरा अबसे आणि कदिजा सुल्तानासोबत तुर्कस्तानमार्गे सीरियाला पोहोचली. तिथे तिला मूळचा नेदरलॅँड्सचा यागो रियेदिक भेटला.तो जन्माने इसाई होता, पण त्याने मुस्लीम धर्म स्वीकारला.




तो ‘इसिस’साठी काम करायचा. शमीमा आणि यागोने म्हणे लग्न केले. त्यांना तीन मुले झाली. तिची दोन मुले कुपोषणाने वाारली, तर एक मुलगा न्यूमोनियाने वारला. विशीतच शमीमा तीन मुलांची आई बनली. इसिसमध्ये आयुष्य नाही, मानवी जगणे तर मुळीच नाही, हे कळल्यावर शमीमाला पुन्हा ब्रिटनला यायचे आहे. तिने तसा रितसर अर्जही केला. पण, 2019 साली ब्रिटनचे गृहसचिव साजिद जावेद यांनी तिची मागणी फेटाळली. तसेच तिचे ब्रिटनचे नागरिकत्वही रद्द केले. ब्रिटनचे म्हणणे होते की, तिच्या पालकांची मायभूमी बांगलादेश होती. ती तिथे जाऊ शकते. यावर बांगलादेशचे म्हणणे होते की, बांगलादेशमध्ये दहशतवादाशी संबंधितांना फाशीची शिक्षा आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये तिला फाशीची शिक्षाच होणार. यावर यागो रियेदिकचे म्हणणे की, त्याची मायभूमी नेदरलँड्स आहे, त्यामुळे त्याला आणि शमीमाला नेदरलँड्समध्ये राहण्याची परवानगी मिळावी. मात्र, बांगलादेशप्रमाणे नेदरलँड्सनेही या दोघांना दरवाजे बंद केले.


शमीमा सध्या सीरियाच्या शरणार्थी शिबिरात राहते. तिथे तिच्या सारख्या अनेक मुली आहेत, ज्या ‘इसिस’ दहशतवाद्यांच्या विधवा आहेत किंवा या दहशतवाद्यांनी बळजबरीने अपहरण करून आणलेल्या मुली आहेत. असो, ब्रिटनचे नागरिकत्व मिळावे यासाठी शमीमाने कायदेशीर पाऊल उचलले. अतिरेक्यांच्या क्रूर कारवायांचे कौतुक बाळगणारी, त्यासाठी कसलीच तमा न बाळगता अत्यंत व्यवस्थित योजना आखून सीरियाला जाणारी शमीमा. ब्रिटनला परतण्याच्या तिच्या याचिकेवर ब्रिटनच्या एका न्यायालयाने तिला ब्रिटनमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, नि:पक्ष वातावरणात तिला तिची बाजू मांडता यावी, म्हणून तिला ब्रिटनमध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. यावर ब्रिटन सरकार नाराज आहे. शमीमाला ब्रिटनमध्ये येऊ देऊ नये म्हणून ते पुन्हा याचिका दाखल करणार आहेत. यावर शमीमाचे म्हणणे की, लोकांनी तिच्याबद्दल सहानुभूती बाळगावी. पण, ती हे मात्र विसरत नाही की, ‘इसिस’चे कृत्य हे न्यायासाठीची लढाई आहे आणि ‘इसिस’मध्ये सहभागी होण्याबद्दल तिला जराही पश्चाताप नाही.



शमीमा ज्यावेळी ‘इसिस’मध्ये गेली, तेव्हा ती १५वर्षांची होती. त्यावेळी तिला जगाचा अनुभव नसेलही. पण, आता ‘इसिस’चा अनुभव आल्यानंतर, तीन मुलांना जन्म दिल्यानंतर वयाच्या विशीमध्ये शमीमाला काही समजत नाही, म्हणून ती असे म्हणते असे मानणे म्हणजे जरा अतीच होईल. गुन्हेगार कधीही जन्माने गुन्हेगार नसतो हे मान्य. पण, केलेल्या गुन्ह्याचे समर्थन करत वर ‘मला तेच वातावरण आवडते, पण तरीही माझ्या गुन्ह्याला विसरून मला स्वीकारा,’ असे म्हणणार्‍यांना काय म्हणावे? ‘इसिस’ने हजारो याजिदी मुलींवर अनन्वित अत्याचार केले. मात्र, स्वत:ची तीन मुले वारली म्हणून जगण्याची किंमत समजणारी शमीमा या याजिदींच्या जगण्याचे मोल जाणते का? जगाने तिला मानवी न्यायासाठी स्वीकारावे असे शमीमा सांगते. पण, मग ‘इसिस’ने जगावर नव्हे, अवघ्या माणुसकीवर केलेल्या अन्यायाबद्दल आणि शमीमाने त्याचे केलेल्या समर्थनाबद्दल काय? शमीमा आणि तिच्यासारख्या लोकांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगायलाच हवे. हाच मानवी न्याय आहे.

@@AUTHORINFO_V1@@