वरवरा राव कोरोना पॉझिटीव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020
Total Views |

Varvara Rao File PIC _1&n




मुंबई : एल्गार परिषदेत प्रकरणी माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याचे वकील सुदीप पासबोला यांनी ही माहिती दिली. सोमवारी राव यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. १४ जुलै रोजी त्यांचे स्वॅब जमा करण्यात आले आहे.


कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणाशी संबध आल्याने ८१ वर्षीय कार्यकर्ता वरवरा राव कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. तुरुंगात भोवळ आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. रंजित मनकेश्वर यांनी म्हटल्यानुसार, वरवरा यांच्यात कोरोनाचे लक्षण आढळलेले नाहीत. त्यांना श्वसनाचाही त्रास होत नाही. लवकरच त्यांना कोरोना रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात वरवरा राव यांची प्रकृती बिघड़ली होती.


२८ मे रोजी बेशुद्ध पडल्यानंतर वरवरा राव यांची प्रकृती वारंवार खराब आहे. त्यांना बेशुद्ध अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न करण्यात आले. एनआयएने त्यांच्या जामीन याचिकेचा विरोध करत पुन्हा तुरुंगात पाठवले होते.


महाराष्ट्रात कोरेगाव-भीमा एल्गार परिषद प्रकरणातील आरोपात राव यांना जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यांना एका आरोपीसह येरवडा येथून तळोजा कारागृहात पाठवण्यात आले होते. मुंबईतील तुरुंगात पाचशेहून जास्तजण कोरोनाग्रस्त आहेत. तसेच चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.




@@AUTHORINFO_V1@@