सेनेसमोर लोटांगण घालून काँग्रेस पक्ष संपवून बसाल : संजय निरुपम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020
Total Views |

L Sanjay Nirupam R Uddhav

मुंबई : महाविकास आघाडी प्रणित सरकारवर काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मातोश्री - २ या इमारतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाईच्या हालचाली होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सगळ्यावर निरुपम यांनी टीका करत राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला आहे. शिवसेनेला अंगावर घेतले नाही, त्यांच्यासमोर झुकत राहिलात तर उरली सुरला काँग्रेस पक्षही राज्यात संपुष्टात येईल. 


मंत्र्यांनी शिवसेनेसमोर झुकणे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. खासदार संजय निरुपम म्हणतात, "सरकारमध्ये मतभेत असतात. सत्तेतील इतर पक्षाला प्रश्न विचारणे गुन्हा आहे का ?, काँग्रेसने पक्ष शिवसेनेत विलीन केला आहे का ? एखादा प्रश्न विचारला तर मी पक्षविरोधी कसा झालो. म्हणजे उद्ध्व ठाकरे यांच्या मातोश्री - २ या बंगल्याच्या गैरव्यवहाराबद्दल मी काहीच बोलू नये का ?, असे थेट प्रश्न त्यांनी विचारत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच लक्ष्य केले आहे.



राज्य सरकारच्या महाजॉब पोर्टलमध्ये काँग्रेस नेत्यांचा फोटो नसल्याबद्लही निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसही सत्तेत आहे ना ? मग युवकांना रोजगार देणाऱ्या जाहीरातीत काँग्रेस नेते का नाहीत ?, ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेबद्दल अगाध प्रेम आहे त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, अशी टीका त्यांनी पक्षावर केली आहे. शिवसेनेसमोर लोटांगण घालून पक्ष संपवू नका, असे आवाहन त्यांनी केले.





@@AUTHORINFO_V1@@