आदित्य ठाकरेंची पेंग्विनशी तुलना भोवली 'एफआयआर' दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020
Total Views |

FIle photo _1  




मुंबई
: राज्याचे कॅबिनेट मंत्री यांची तुलना पेंग्विनशी करणे एका युवकाला चांगलेच भोवले आहे. मुंबई पोलीसांनी आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन म्हणणाऱ्या नागपूरच्या समीत ठक्कर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार तीस वर्षीय समीर याने १ जून, ३० जून आणि १ जुलै रोजी आदित्य ठाकरे यांची पेंग्विनशी तुलना केली तर उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधातही टीका केली होती. 

वीपी रोड पोलीसांनी गेल्या सोमवारी समीत ठक्कर यांच्याविरोधात मानहानीकारक मजकूर लिहीणे व अश्लील लेख प्रसारीत करण्याअंतर्गत गुन्हा माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. समित ठक्कर यांचे ट्विटरवर ४२ हजार ७०० फॉलोअर्स आहेत. समित ठक्कर याने ट्विट केलेल्या व्हीडीओमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या विरोधात आता आवाज उठवण्यात येत आहे, ट्विटरवर #BabyPenguin हा ट्रेंड सुरू आहे. 



tweet _1  H x W
@@AUTHORINFO_V1@@