च्यवनप्राश अन् तंदुरुस्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020   
Total Views |

vedh_1  H x W:


“जिल्ह्यात मनसेची मोठी पडझड झाली असून ती सावरण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ताकद उरली नसून तंदुरुस्त राहण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांनीच च्यवनप्राश खाल्ले पाहिजे,” असे मतही महापौरांनी व्यक्त केले. शहरात कोरोनावाढीला मनपा प्रशासन जबाबदार असून महापौर कुठेच दिसत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.



कोरोना काळात च्यवनप्राशचे सेवन करा आणि तंदुरुस्त राहा, असा सल्ला दिला जातो. मात्र, नाशिक शहरात सध्या हेच च्यवनप्राश कोणाला तंदुरस्त राखण्यासाठी आवश्यक आहे, याची चर्चा रंगली आहे. त्याचे झाले असे की, कोणेकाळी नाशिकमध्ये सत्तेत असलेल्या व त्यावेळी तीन आमदार असलेल्या मनसे नावाच्या पक्षाने नाशिक महापौर यांना च्यवनप्राश भेट देत आपला त्यांच्या कार्यपद्धतीबाबतचा निषेध नोंदविला. वयाने तरुण आणि अनुभवाने लहान अशा मनसे कार्यकर्त्यांनी असे कृत्य करत नाशिक नगरीचे प्रथम नागरिक यांचा वयाचा व अनुभवाचा अपमानच केल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटली. त्यावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पक्षवाढीसाठी च्यवनप्राशची खरी गरज मनसेलाच असून कार्यकर्त्यांनी ते खाऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, असा टोलाही मनसेला लगावला. तसेच, “जिल्ह्यात मनसेची मोठी पडझड झाली असून ती सावरण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ताकद उरली नसून तंदुरुस्त राहण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांनीच च्यवनप्राश खाल्ले पाहिजे,” असे मतही महापौरांनी व्यक्त केले. शहरात कोरोनावाढीला मनपा प्रशासन जबाबदार असून महापौर कुठेच दिसत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.


च्यवनप्राश हा तसा साधारण पदार्थ. कोरोना काळात तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. आता मात्र त्याला नाशिकमध्ये राजकीय वलयच प्राप्त झाले. च्यवनप्राश विकत घेण्यास गेल्यास कोणासारखे तंदुरुस्त व्हायचे आहे, भाजप की मनसे? असा विनोदाने सवाल केला जात आहे.आज भाजप सत्तेत ‘आहे.’ यापूर्वी मनसे सत्तेत ‘होती.’ यातील ‘आहे’ आणि ‘होती’मधील फरक हा नागरिकांनीच मतदानाच्या रूपाने दाखवून दिला आहे. तेव्हा इंजिनाने वयाचे आणि त्यांच्या आजवरच्या अनुभवाचे व योगदानाचे भान बाळगत तरी शहराच्या प्रथम नागरिकांशी वर्तन करणे आवश्यक होते असेच यानिमित्ताने वाटते. असो... शेवटी मुद्दा हाच आहे की, कोणीही कोणाला काहीही भेट द्या, अथवा सल्ले द्या, मात्र कोरोनाच्या भयानक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करा, एवढीच नाशिककरांची इच्छा.


दे दान सुटे गिराण...


सध्या राज्य शासनाच्या कोरोना काळातील सुयोग्य नियोजन(?) ‘लॉकडाऊन’ आणि ‘अनलॉक’बाबतची उत्कृष्ट निर्णयक्षमता (?) यामुळे राज्याला ऑनलाईन सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. यात शिक्षण क्षेत्र तरी मागे कसे असणार? सध्या गुरुजी हे ‘ऑनलाईन’ ज्ञानदानात व्यग्र आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे या गरीब विद्यार्थ्यांसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्टफोन गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘तंत्रसेतू नाशिक’ हेल्पलाईन व ‘विद्यावाहिनी रेडिओ’ या उपक्रमांच्या माध्यमातूनदेखील या विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीतील सावळ्या गोंधळाचे ग्रहण सुटावे म्हणून मोबाईलचे दानच आता ‘मिनी मंत्रालया’वर मागण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळातदेखील विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेचे आहेच. त्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे.


मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यासाठी साधन उपलब्ध नाही. त्यासाठी घरात पडून असलेला जुना स्मार्टफोन दान करावा, अशी गळ नाशिक जि. प. आत घालणार आहे. त्यामुळे दान करण्यात आलेला जुना फोन हा नवीन ध्येयधोरणास अनुषंगून किती उपयुक्त ठरेल, याबाबत शंकाच आहे. तशीही नाशिक जिल्ह्यातील वनवासीबहुल क्षेत्रात ऑनलाईन शिक्षण प्रणालीबाबत शंका आहेच. नेटवर्क-रेंजची असणारी समस्या, गरीब पालक वर्ग यामुळे समोर असणारी आर्थिक आव्हाने अशा धर्तीवर ऑनलाईन शिक्षण हे या भागात न परवडणारे आहे. तशीच स्थिती ही जिल्हा परिषद शाळेतील पालकांची आहे, हे वास्तव आहे. तेच या मोबाईल संकलन मोहिमेमुळे समोर आले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘डोनेट अ डिव्हाईस’ नावाने सुरु करण्यात आलेली ही चळवळ एका अर्थी चांगलीदेखील आहे. डिजिटल कचरा यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच, काही दानशूर या मोहिमेत विद्यार्थ्यांना आवश्यक त्याप्रमाणे साधनेदेखील उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची चळवळ ही साधनापासून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीदेखील उपयुक्त ठरणारी आहे.
@@AUTHORINFO_V1@@