अखेर ट्रम्प सरकारचा ‘तो’ निर्णय मागे ; विद्यार्थ्यांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020
Total Views |

Donald Trump_1   
नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला शिक्षणाबाबतचा निर्णय अखेर मागे घेतला. ट्रम्प सरकारने काही दिवसांपूर्वी अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. अखेर विद्यापीठ आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या दबावानंतर हा निर्णय मागे घेतला. यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प सरकारला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
 
 
ट्रम्प प्रशासनाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना लवकरात लवकर सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु करण्यास ६ जुलै रोजी सांगितले होते. जे परदेशी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, त्यांना अमेरिकेत राहण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले होते. या विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली. ट्रम्प सरकारच्या निर्णयाविरोधात जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड, एमआयटी या विद्यापीठांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मंगळवारी ट्रम्प प्रशासनातील इमिग्रेशन आणि कस्टम विभागाने न्यायालयात हा निर्णय मागे घेण्याची तयारी दर्शवली. ट्रम्प सरकारच्या यूटर्नमुळे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@