जिओ आणणार संपूर्ण स्वदेशी 5G नेटवर्क : मुकेश अंबानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020
Total Views |

Mukesh Ambani _1 &nb





मुंबई : परवडणाऱ्या दरात वेगवान फोर जी नेटवर्क देणाऱ्या जिओने (Reliance Jio) डिजिटल जगाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात देशभरात कमीतकमी किंमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचे असलेल्या फाईव्ह जी तंत्रज्ञानाची घोषणा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली आहे. 

रिलायन्सची ४३वी सर्वसाधारण सभा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पार पडली. रिलायन्सचे १ लाखाहून जास्त भागीदार (Share Holders) यात सहभागी झाले. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पावले उचलत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्स जागतिक दर्जाचे फाईव्ह जी (5G) तंत्रज्ञान आण्यासाठी सज्ज आहे, असे त्यांनी म्हटले.




देशात ५ जी स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यानंतर त्याची चाचणी सुरू केली जाणार आहे. पुढील वर्षापर्यंत देश फाईव्ह जी या अधिक वेगवान इंटरनेटचा अनुभव घेऊ शकणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचरच्या रणनितीमुळे आर्थिक गुंतवणूक मिळवण्यात जिओला मोठे यश मिळाले. रिलायन्सने यापूर्वीच ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवत जिओ मार्ट ग्रोसरी मोजेल विकसित केले आहे. ज्यात किरकोळ दुकानदार भागिदार आहेत. 

या सभेत त्यांनी गुगलच्या गुंतवणूकीबद्दलही घोषणा केली. जिओने गुगलमध्ये ७.७७ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ही गुंतवणूक एकूण ३३ हजार ७३७ कोटी रुपये इतकी असणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कंपनीने पहिल्यांदाच व्हर्च्युअल एजीएम घेतली. देशभरातील शेअर धारकांनी यात हिस्सा घेतला. 

मेड इन इंडिया असणार 5G नेटवर्क 

अंबानी म्हणाले, "भारतात 5G नेटवर्क सेवा लॉन्च केली जाणार आहे. ही संपूर्णपणे मेड इन इंडिया असेल. ज्यावेळी स्पेक्ट्रम उपलब्ध होईल त्यावेळी त्याची चाचणी घेतली जाणार आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत एक मोठे पाऊल उचलले आहे. 'ओरीजनल कॅप्टीव्ह इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डेव्हलप'द्वारे तयार होणारे नेटवर्क भविष्यात भारतात सुरू झाल्यानंतर संपूर्ण जगभरासाठी खुले होईल."


वोकल फॉर लोकल वर भर

रिलायन्सने डीप डोमेन नॉलेज तयार केले आहे. जियो प्लेटफॉर्म डोमेन एक्सपर्टाइजसह नव्या इकोसिस्टम तयार करणार आहे. अंबानी म्हणाले, "मी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी एक लक्ष्य समोर ठेवत आहे. स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार कंपनीचा आहे. फाईव्ह जीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर कंपेलिंग सोल्यूशंस तयार होतील. नव्या इकोसिस्टीम्स तयार होतील. मीडिया, वित्तीय सेवा, न्यू कॉमर्स, एज्युकेशन, हेल्थकेअर, कृषी व स्मार्ट सिटी यांचा सामावेश असेल. 
५०० कोटी जीबी डेटाची एका महिन्यात डिलिव्हरी

मुकेश अंबानी म्हणाले, "एका महिन्यात पाचशे कोटी जीबी डेटाची डिलिव्हरी झाली आहे. एक दशलक्षहून अधिक घरांमध्ये जिओ फायबर सेवा पोहोचली आहे. कोरोना महारारीनंतर देश वेगाने प्रगती करेल. यात कुठलीही शंका नाही. जीओ मीट आत्तापर्यंत ५० लाखांहून अधिक ग्राहकांनी वापरला आहे.

भारताला 2G मुक्त बनवणार

भारताला 2G सेवा मुक्त करण्यासाठी गूगल अॅण्ड्रोईड आधारीत नवे स्मार्टफोन्स तयार करण्यास जिओ मदत करणार आहे. भारतात ३५ कोटी लोग आजही 2G सेवा वापरत आहेत. त्यांच्या हातात स्मार्टफोन पोहोचवण्याची जबाबदारी जिओने उचलली आहे. 

जगातील सर्वात मोठा राईट इश्यू


अंबानी म्हणाले, "जगातील सर्वात मोठा राईट्स इशू आपण सफल बनवला आहे. भारतातील शेअर बजारातील सर्वात यशस्वी इशू होता. प्रत्येक संकटात मोठ्या संधीही निर्माण होतात. जिओमधील प्रत्येक भागीदाराचे आम्ही स्वागत करत आहोत."



ओटूसीमध्ये विस्तार होणार


मजबूत ताळेबंदासह जियो, किरकोळ बाजार आणि ओटूसी (ऑर्डर टू कॅश) या क्षेत्रात विस्तार करणार आहे कस्टम्स आणि एक्साइज ड्यूटी स्वरुपता रिलायन्सने २१ हजार ६६० कोटी रुपयांचा परतावा केला आहे. भारतात कुठल्याही खासगी क्षेत्रात ही 
सर्वात मोठी रक्कम आहे.


जिओ ग्लासचीही घोषणा 

कोरोनच्या संकटातही जिओने नवनव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. आज सर्वसाधारण सभेत जिओ ग्लासचीही घोषणा केली आहे. ७५ ग्रॅम वजनी असलेल्या या जिओ ग्लासमध्ये सेन्सर आणि काही अत्यावश्यक हार्डवेअर बसवण्यात आली आहेत.  


कोरोनाने जगाला डिजिटल बनवले


मुकेश अंबानी यांनी आपल्या सभेत म्हटले कि, २०२० प्रत्येकजण डिजिटल स्वरुपात आला. कोरोनाने जगातील प्रत्येक गोष्टींवर आपला ठसा उमटवला. जिओ कनेक्टीविटी आणि प्लॅटफॉर्मस या दोन गोष्टींवर टीकून आहेत. जिओ ब्रॉडबॅण्ड आणि जिओ फायबर ही दोन्ही क्षेत्रे आमचे लक्ष्य असणार आहेत. 


नव्या तंत्रज्ञानाची कवाडे खुली


जिओ टिव्ही प्लस लॉन्च करण्याची घोषणाही त्यांनी केली. जागतिक पातळीवर हे उत्पादन उपलब्ध असणार आहे. नव्या इंडियाचा नवा जोष, असे याचे स्लोगन असणार आहे जिओ सेट टॉप बॉक्स, जिओ टीवी प्लस आणि १२ ओटीटी प्लेटफॉर्मद्वारे ग्राहकांना कनेक्ट केले होते. जिओ फायबरमध्ये इंटरेक्टीव्ह टीव्ही असणार आहे. आकाश आणि ईशा अंबानी यांनी एजीएम मध्ये
नव्या जियो टीवीचे अनावरण केले.
जिओमार्ट नवे प्लॅटफॉर्म


जिओमार्टद्वारे नव्या कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. जिथे ग्राहक, उत्पादक, किराना दुकानदार यांना एकत्रित आणण्याचे काम केले जाणार आहे. संपूर्णपणे डिजिटल स्वरुपात असलेल्या या किराणा स्टोअरद्वारे व्यवहार सुरू असतील.

सुंदर पिचाई यांनीही केली घोषणा 


गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जिओसह केलेल्या भागीदारीबद्दल आम्हाला गर्व असल्याचे सांगितले. याच आठवड्यात भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक आणणार असल्याचा पूर्नउल्लेखही त्यांनी केला. नव्या पीढीसह तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. स्मार्टफोन्स आणि स्वस्त डेटा यामुळे भारत नव्या तंत्रज्ञाची पायरी 
चढत आहे, असे ते म्हणाले.

देशातील स्टार्टअप्सला जिओशी जोडण्याचा विचार


मुकेश अंबानी यांनी भारतातील ६० दशलक्ष छोट्या उद्योगधंद्यांना सोबत जोडण्याचा विचार त्यांनी केला. फेसबूकसह भागीदारी केल्याने हे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले. स्टार्टअप्सना जोडल्यानंतर मोठे व्हर्च्युअल व्यासपीठ तयार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतीय स्टार्टअप्सकडे जिओविना कुठलाही सक्षम भागीदार किंवा पर्याय नाही, त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करत आहे, असेही ते म्हणाले.



@@AUTHORINFO_V1@@