‘संकल्प’चा ‘कोरोना’विरुद्ध लढण्याचा संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020
Total Views |

sankalpa_1  H x



‘संकल्प’ संस्था आठ वर्षांपासून वस्ती विकासच्या दृष्टिकोनातून काम करीत आहे. ‘संकल्प’ संस्था ‘एम-पूर्व’ आणि कुर्ला विभागात कार्यरत असून प्रामुख्याने शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, वस्ती संघटन आदी क्षेत्रात विविध सामाजिक जबाबदार्‍या पार पाडत आहे.



संकल्प’ संस्थेचे आनंद नगर आणि रफी नगर या विभागात १५०विद्यार्थ्यांकरिता अभ्यास वर्ग चालविणे,विद्यार्थ्यांना रोज सकस आहार देणे, आठवड्यातून दोन वेळा मनोरंजन कार्यक्रम घेणे, विविध स्पर्धा आणि शिबिरांचे आयोजन करणे, युवकांना व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणे, मोफत बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स, नर्सिंग कोर्स, वाहन-चालक प्रशिक्षण, महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटन करून लघू उद्योग सुरू करणे, त्याच्यासाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करणे, आरोग्य शिबीर घेणे, वस्तीच्या विविध विषयांवर जनजागृती करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्वच्छता, नशामुक्ती यांसारखे कार्यक्रम राबविणे, राष्ट्रीय सण साजरा करणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे सुरू असतात. ‘संकल्प’ संस्था रफी नगर, शांतीनगर, पद्मानगर, इंद्रानगर, शिवाजीनगर, आनंदनगर, गोवंडी, तसेच कुर्लामधील जागृतीनगर, साबळेनगर, वर्षा-आदर्शनगर या विभागातील असंघटित क्षेत्रातील कुटुंबांसोबत काम करीत आहे. मात्र, २२मेपासून ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यामुळे सर्व प्रकल्प बंद करण्यात आले. या वस्तीमध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार, घरकाम करणारे, महिला सफाई कामगार, नाका कामगार, रिक्षा-टॅक्सीचालक बांधव वास्तव्यास आहेत. हे सर्व रोजंदारीवर अबलंबून आहे. दैनंदिन मिळणार्‍या उत्पन्नावर कुटुंब अवलंबून आहे. या हातावर पोट असणार्‍या वर्गाची कोरोनाच्या विरोधात लढता लढता भुकेच्या विरोधातील लढाई अधिक भयंकर झाली होती.



या राष्ट्रीय आपत्तीमुळे आज सर्वजण या संकटाचा सामना करीत होते. या अडचणीत माणुसकीची हाक देण्यासाठी ‘संकल्प’ संस्थेच्या पुढाकाराने ‘संकल्प’चा कोरोना विरुद्ध लढा’ हा उपक्रम सुरू केला. संस्था गेली 85 दिवस दररोज ५०० कुटुंबांना रोज दोन वेळेचे अन्नदान करत आहे. तसेच संस्थेने २१०० कुटुंबांना १५ दिवसांचे रेशन किट (धान्य) वाटप केले. तसेच विविध वस्त्यांमध्ये २५०० मास्क वाटप केले. वस्ती स्तरावरची दुकाने बंद होती. त्यामुळे लोकांना गरजेच्या वस्तूही विकत मिळाल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये संस्थेने ३५०० गरजू महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. तसेच पाच हजार कुटुंबांतील लोकांना टुथपेस्टचे वाटप करण्यात आले. गोवंडी परिसरात कचरावेचक बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. या कचरावेचक बांधवांना ३०० फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. काही वस्त्यांमध्ये ‘आर्सेनिक अल्बम-३० ’च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. काही कुटुंबांतील व्यक्तींना औषधे घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना औषधे घेऊन दिली. ३२ कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मार्गदर्शन करून त्यांना मदत केली. १९ व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला. वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती कार्यक्रम घेतले. लोकांना कोरोनाला घाबरु नका, पण काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितले. तसेच पद्मानगरला दि. ५ जून रोजी खूप मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. यामध्ये जवळपास ३० कुटुंबांची घरे पूर्ण जळून खाक झाली. यावेळी ‘मायग्रीन सोसायटी’,‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून ३० कुटुंबांना १५ दिवसांचे रेशन किट आणि ताडपत्री काही दिवस नाश्ता वाटप करण्यात आले होते. त्याचबरोबर ३० कुटुंबांना भांडी देण्यात आली. हे सगळे कार्य शक्य झाले ते समाजाच्या सहभागामुळे. या सर्व सकारात्मक समाजशक्तीचे धन्यवाद!

या कार्यात सहभागी सामाजिक संस्था

महानगरपालिका ‘एम पूर्व’ विभाग, मायग्रीन सोसायटी केशवसृष्टी, त्रिरत्न प्रेरणा मंडळ, निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, मनपसंत लाईफ, आयडिया फाऊंडेशन, गोबॅण्ड फाऊंडेशन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, आदर्श फाऊंडेशन, जनजागृती विद्यार्थी संघ, वेद फाऊंडेशन, रिन्होवेट इंडिया, ब्राईट ब्रचर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चेंबूर, सत्यमेव जयते वार्ता चॅनल, राही सामाजिक संस्था


‘संकल्प’ संस्थेचे स्वयंसेवक

वासुदेव पाटील, सुषमा हिवाळे, सना खान, नसरीन अन्सारी, लक्ष्मी काळे, अंजुम अन्सारी, राहुल कटारे, विक्रम हिवाळे, रंजना निकाळजे, शालिनी कांबळे, कांता रोकडे, अर्जुन माने, योजना लोखंडे.


- विनोद हिवाळे
(लेखक ‘संकल्प’ संस्थेचे अध्यक्ष आहेत)
@@AUTHORINFO_V1@@