डब्ल्यूएचओ म्हणते, शाळांना राजकीय फुटबॉल करू नका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020
Total Views |

WHO_1  H x W: 0
 
नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने अनेक देशांमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली असून शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका, असा इशारा दिला आहे.
 
 
  
डब्लूएचओचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळा सुरू करण्यासाठी घाई केली जाऊ नये, असे म्हटले आहे. तसेच शाळांना राजकारणात आणू नये. एकदा कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु केल्या जाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. माइक रायन यांनी यावेळी अमेरिकेसारख्या देशात मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाऊन केला जावा असा सल्ला दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल, असे रायन यांनी म्हंटले आहे. जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल, अशी भीती डॉ. टेड्रोस यांनी व्यक्त केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@