राजस्थान : कॉंग्रेसने सचिन पायलट आणि राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारविरुध्द बंड पुकारलेल्या अन्य दोन मंत्री यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर काहीवेळातच सचिन पायलट यांनी ट्विटवरून काँग्रेसला राम राम केला आहे.आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर तात्काळ काही बदल केले आहेत.
'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं ', असे ट्विट करत त्यांनी आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये उपमुख्यमंत्री असल्याचे लिहिले होते. तसेच राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष असल्याचे देखील लिहिले होते. मात्र आता सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदाची असलेली ओळख पुसून टाकली आहे. तसेच प्रोफाइलमध्ये त्यांनी आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री असा उल्लेख ठेवला आहे. कॉंग्रेस हाय कमांडच्या निर्णयानंतर त्यांनी ट्वीट करत हे बदल केले आहे.
तत्पूर्वी, सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपद काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षाने कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले आहे.