‘प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते…’; नेपाळचे पंतप्रधान बरळले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020
Total Views |

oli nepal_1  H



खरी अयोध्याही नेपाळमधेच असल्याचा केपी शर्मा ओली यांचा अजब दावा!


काठमांडू : भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. असा अजब दावा नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला आहे. भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते असे वक्तव्य केपी शर्मा ओली यांनी केले आहे.


कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे अजब दावे केले आहेत. नेपाळमधील बिरगुंजजवळ अयोध्या नावाचे खेडे आहे आणि तीच रामाची जन्मभूमी असल्याचा दावा ओली यांनी केला आहे. वाल्मिक ऋषींचा आश्रमदेखील नेपाळमध्ये आहे आणि इथेच पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरथाने पूजा केली होती, असेही ओली यांचे म्हणणे आहे.


पूर्वीच्या काळी टेलिफोन किंवा मोबाईलसारखी संवादाची कोणतीही माध्यमे नसताना राम भारतातील अयोध्येतून जनकपूरला सीतेशी लग्न करण्यासाठी कसा काय येऊ शकला असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.


एकंदरीत नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी गेल्या काही दिवसात उघडपणे भारतविरोधी भूमिका घेतलेली आहे. भारताने दावा केलेले भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवणे, नेपाळमधील कोरोनाच्या संकटाला भारताला जबाबदार धऱणे आणि आता थेट सांस्कृतिक आक्रमणाचा आरोप त्यांनी भारतावर केला आहे.


या आधी भारत मला माझ्या पदावरून दूर करत असल्याचा आरोप त्यांनी कित्येकदा पत्रकारांशी बोलताना केला आहे. गेल्या काही दिवसांपासून केपी शर्मा हे भारताविरुध्द भुमिका घेत असताना दिसत आहेत. अनेक कारणांमुळे त्यांचं पंतप्रधानपदही धोक्यात आहे. ते टिकवण्यासाठीही कित्येकदा धडपडत असताना आणि चर्चेची विधाने करत असताना दिसत आहेत. या सगळ्यात त्यांनी थेट रामजन्मभूमीवरच आरोप करण्यास सुरूवात केली आहे.




@@AUTHORINFO_V1@@