सैनिकांच्या अंत्यसंस्काराचीही परवानगी देत नाही चीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2020
Total Views |
Galwan Vally _1 &nbs






नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झटापटीत मारले गेलेल्या आपल्या सैनिकांची संख्या सांगण्यास चीन नकार देत असला तरीही अमेरिकेने एका अहवालातून ड्रॅगनची पोलखोल केली आहे. चीन सरकार आपल्या सैनिकांच्या अंत्यसंस्काराचीही परवानगी कुटूबिंयांना देत नसल्याची माहिती अमेरिकेने उघड केली आहे. 


अमेरिकेच्या गुप्त अहवालात म्हटल्यानुसार गलवान खोऱ्यातील कारनामे उघड होतील या भीतीने चीन अंत्यसंस्कार करू देत नसल्याचा आरोप सैनिकांच्या कुटूंबियांनी नातेवाईकांवर केला आहे. चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत दोन्ही सैन्याचे नुकसान झाले होते. भारताने शहीद झालेल्या सैनिकांची संख्या तत्काळ जाहीर केली होती. तसेच हुतात्मा जवानांना सन्मानपूर्वक निरोपही दिला होता.




दुसरीकडे चीन मात्र, चीनी सैनिकांच्या मृत्युबद्दल माहिती वारंवार लपवत आहे. अद्यापही त्यांनी खुलासा केला नाही. अमेरिकेच्या ब्रेइटबार्ट न्यूज अहवालानुसार, चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या या निर्णयामुळे सैनिकांचे परिवार नाराज आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत.



@@AUTHORINFO_V1@@