अॅपलही देणार चीनला मोठा धक्का!

    13-Jul-2020
Total Views |

Foxconn_1  H x



चीनमधून बाहेर पडत भारतात उत्पादन सुरु करण्याचा घेतला निर्णय!


दिल्ली : जगप्रसिद्ध ‘आयफोन’चे उत्पादन करणारी फॉक्सकॉन कंपनी चीनमधील त्यांचे उत्पादन बंद करण्याचा विचार करत असून, संपूर्ण उत्पादन त्यांच्या भारतातील प्लांटमधून करण्याचा विचार करत आहे. चेन्नईमधील पेरुम्बुदूर येथे या कंपनीचा उत्पादन प्लांट असून त्या ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे. १ अरब डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५०० करोड रुपये भारतातील उत्पादनात गुंतवले जाणार आहेत.


कोरोना विषाणूनंतर जगभरातून चीनवर टीका होत असताना, अॅपल कंपनीकडून सदर प्लांट हा चीन बाहेर नेण्यात यावा अशी सूचना आल्याने फॉक्सकॉन कंपनी हे पाऊल उचलल्याचे म्हंटले जात आहे. भारतातील या प्लांटमध्ये आयफोन एक्सआरचे उत्पादन केले जाते. याच प्लांटमध्ये येत्या ३ वर्षात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.


चीनमध्ये फॉक्सकॉनने बनविलेले अॅपलचे इतर मॉडेल भारतात तयार केले जाणार आहेत. फॉक्सकॉनचे मुख्यालय तैवान, चीन येथे आहे आणि कंपनीच्या या निर्णयामुळे पेरुम्बुदूर प्रकल्पात जवळपास ६००० रोजगार निर्माण होतील. आंध्र प्रदेशातही या कंपनीचा एक प्रकल्प असून, तिथे शाओमी कंपनीसाठी स्मार्टफोन बनवले जातात. .