सप्टेंबरपर्यंत लस येणार! दोन वर्षांपर्यंत रोखू शकते कोरोना !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |
corona virus _1 &nbs



मॉस्को : रशियाचे सेचेनोव विद्यापीठ कोरोना लस तयार करण्याच्या सर्व प्रक्रीयांमध्ये पुढे आहे. Gam-COVID-Vac Lyo, असे नाव असलेल्या या कोरोनाच्या लसीचे मनुष्यावरील चाचणी पूर्ण झाली आहे. सेचनोव विद्यापीठातील इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल पॅरासिटोलॉजी ट्रॉपिकल अॅण्ड वेक्टर-बॉर्न डिसीजचे संचाल अलेक्जेंडर लुकाशेव यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

आमचा संकल्प हा कोरोनावरील लस तयार करून मानवी आयुष्याला संरक्षण देण्याचा होता. सुरक्षेच्या मुद्द्यावर कोरोना लसीची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण झाली आहे. सर्व चाचण्या पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते लस 

कोरोना लस तयार करणाऱ्या गेमली इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजीच्या संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे वृत्तपत्र क्रासन्या झवेजदा याला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पहले आणि दूसऱ्या लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम ही लस करते. तसेच दीर्घकाळापर्यंत टीकवूनही ठेवते. पुढील दोन वर्षांपर्यंत कोरोनाशी लढण्यासाठी ही लस उपयोगी ठरेल, असा दावा अलेक्झांडर यांनी केला आहे.

रशियाचे संरक्षण मंत्रालय करत आहे मदत

इंस्टीट्यूट फॉर ट्रांसलेशनल मेडिसिन अॅण्ड बायोटेक्नोलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमली इन्स्टीट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अॅण्ड माइक्रोबायोलॉजीतर्फे केलेल्या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. रशियन वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, १८ जूनपासून याची चाचणी सुरू झाली होती, त्यात १८ स्वयंसेवक होते. दुसऱ्या टप्प्यात २० जणांवर याची चाचणी करण्यात आली




दोन समुहांवर केली चाचणी 

१५ जुलैपर्यंत याची चाचणी पूर्ण होणार असून १३ जुलै रोजी दुसरी लस देण्यात आली आहे. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, असा दावा करण्यात आला आहे. एकूण ५० जणांच्या या चाचणी समुहात बहुतांश लोक सर्व्हीसमेन आहेत. पाच महिला आणि १० आरोग्य कर्मचाऱ्यांचाही यात सामावेश आहे. दुसऱ्या समुहात शहरातील नागरीकांचा सामावेश करण्यात आला आहे.

रशियाने बनवले कोरोनावीर

रशियातील फार्मा कंपनीने आर फार्म यांनी कोरोनावर इलाज करणारे नवे औषध तयार केले आहे. नव्या औषधाचे नाव कोरोनावीर ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठीही याची मंजूरी देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर हे औषध काम करते. कोरोना विषाणूंचे रेप्लिकेशन म्हणजेच विषाणूंची संख्या रोखण्याचे काम करते.



@@AUTHORINFO_V1@@