मुख्यमंत्री गहलोत समर्थकांवर आयकरची धाड !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

Ashok Gehlot_1  
 
नवी दिल्ली : एकीकडे राजस्थानमध्ये राजकीय वादळ सुरु असतना राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या उद्योगपतींवर आयकर विभागाने छापे मारण्यास सुरुवात केली आहे. अचानकपणे आयकर विभागाचे २०० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. ही सर्व ठिकाणे गहलोत यांच्या निकटवर्तीयांची असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळचे मानले जाणरे ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. याची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली नसल्याची माहिती समोर येत असून आयकर विभागाचे पथक राष्ट्रीय राखीव पोलिस दलासोबत ही छापेमारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री गहलोत यांचे आणखी एक निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांच्या एकूण २४ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. यामध्ये त्यांचे घर आणि कार्यालयाचा समावेश होता. यामुळे आता राजस्थानमधील राजकारण आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@