स्वयंपाकासाठी सुयोग्य भांड्यांचा वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

Cooker_1  H x W


अन्न हे पूर्ण ब्रह्म - भाग 7


अन्नाचे, आहाराचे जसे विविध गुणधर्म आहेत, तसेच ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजविले जाते, ज्या पद्धतीने शिजविले जाते, त्यानुसारही त्याच्या गुणधर्मात बदल होतात. हल्ली स्वयंपाक घरात नॉनस्टिक भांडी अधिक वापरली जातात, ज्यात तेल/तूप कमी लागते. क्वचितप्रसंगी तेला-तुपाशिवायही अन्न शिजते, तसेच त्यात अन्न चिकटत नाही, पटकन सुटते. तिसरा उपयोगी गुण म्हणजे त्याची स्वच्छता करणे खूप सोपे आहे. हे वर-वर दिसणारे फायदे जरी असले, तरी नित्य जीवनात, दैनंदिन वापरात नॉनस्टिक किंवा कूकवेअर वापरू नये. असे का, ते आजच्या लेखात सविस्तर जाणून घेऊया...
 
 
नॉनस्टिक कूकवेअर भांडी ही 'पॉलिटेट्राफ्ल्युओरोइथेलिन’ (PTFE) या सिंथेटिक पॉलिवेअरपासून बनविली जाताता. याचा शोध रॉय प्लुन्केट याने १९३८ मध्ये लावला. त्यात अजून पुढे संशोधन होऊन ’PTFE'च्या जागी ’PFOA' म्हणजेच ’Perfluorooctanoic acid' चा वापर होऊन लागला यालाच ‘सी 8’ असे म्हटले जाते. ‘पीएफओए’ची चाचणी प्राण्यांवर केली असता, त्याचे धोकादायक परिणाम लक्षात आले आहेत. जसे विविध प्रकारचे ट्युमर, नवजात बालकांचे मृत्यू इ. तसेच याचा विषारी प्रभाव आपल्या प्रतिकारशक्तीवर, यकृतावर आणि अंतःस्रावी ग्रंथींवर घेताना आढळला.


‘पीएफओए’ हे रसायन मानवाने तयार केलेले आहे. ते नैसर्गिकरित्या उपलब्ध नाही, पण, त्याचा निचरा वातावरणातून व मानवी शरीरातून लवकर होत नाही. ते त्याच स्थितीत बराच काळ राहते. प्रयोगशाळांमधून प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानुसार ‘पीएफओए’मुळे खालील व्याधींची होण्याची शक्यता वाढते- यकृत-वृषण-स्तन व अग्नाशयाच्या गाठी इ. या पार्श्वभूमीवर Environmental Protection Agency (EPA) ने 2013 मध्ये ’PFOA' वर बंदी आणली आहे. असे असले तरी याचा सर्रास वापर केला जातो.


‘पीएफओए’चे कोटिंग १८९ अंश डिग्री तापमानात निघू लागते. रोजच्या दैनंदिन स्वयंपाकात एवढे तापमान लागत नाही. पण, कमी तापमानातही त्यातून थोडा-थोडा धूर निघतो. दीर्घकाळ टेफलॉन, पीएफओए, नॉनस्टिक, कूकिंग वेअर वापरल्याने त्याचे छोटे कणही अन्नामध्ये मिसळून खाल्ले जातात. केक, पेस्ट्री व अन्य भाजण्याच्या पदार्थात ही भांडी टाळावीत, कारण त्यासाठी दीर्घकाळ अधिक तापमान द्यावे लागते. तसेच, आटवणे, २ तारी, ३ तारी पाक करणे इ. पाककृतीही त्यात करू नयेत. तळणे, भाजणे (अधिक काळ) हेही टाळावे. नॉनस्टिक कूकिंग वेअर नुसतेही गरम करण्यास ठेवू नये. दोन मिनिटांमध्ये ते ५०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.


नॉनस्टिक, पीएफओए, पीटीएफई यांच्या धुराने फ्लूसारखी लक्षणे उद्भवू शकतात. सतत थोडे-थोडे शरीरात गेल्यास ही त्याचा स्वास्थ्यावर अपायकारक परिणाम दिसू शकतात. तेव्हा रोजच्या वापरात ही भांडी टाळावीत. याऐवजी स्टीलची जाड बुडाची भांडी वापरावीत. स्टीलच्या भांड्यांवर गंज येत नाही. तांब्याची, लोखंडाची भांडी घासताना लागणारे श्रम हे कैकपटीने अधिक आहेत. (स्टीलच्या भांड्यांची स्वच्छता व निगा राखणे सोपे आहे.) स्टेन्लेस स्टील हे ’ाशींरश्र रश्रश्रेू’ आहे, ज्यात क्रोमियम, निकेल, सिलिकॉन, कार्बन आहे.



food_1  H x W:
लोखंडी कढई (ज्यात भाजी, आमटी इ. सर्व करता येते असे) ही नित्य वापरात आणावी. शरीराला जे लोह आवश्यक असते, ते या कढईतून अन्न शिजताना मिसळते. भाजी-आमटी इ. त्यात तयार केलेली जिन्नसे कधी काळपट दिसतात, पण त्यांचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाही. बरेचदा, भाजीचा व अन्य शिजविलेल्या अन्नाचा रंग, स्वाद इ. बदलू नये म्हणून अ‍ॅल्युमिनिअमची भांडी वापरली जातात. यात अन्न लवकर शिजते आणि लोखंडी भांड्यांमधून शिजवलेल्या अन्नाप्रमाणे त्या जिन्नसात काही बदलही होत नाही. पण, अ‍ॅल्युमिनिअम बौद्धिक वाढीसाठी अपायकर आहे. गर्भिणींसाठी व बालकांचे अन्न शिजवताना अ‍ॅल्युमिनिअम संपूर्ण टाळावे. या भांड्यांमुळे प्रतिकारशक्तीही कमी होते.


पूर्वीच्या काळी मातीची भांडीही वापरत. हल्ली कुल्लडचा चहा जो प्रसिद्ध झाला आहे, तोही मातीच्या भांड्यातूनच प्यायला जातो. पण, हे फक्त गरम करून त्यात ओतले जाते. त्यात चहा तयार केला जात नाही. अन्न जेव्हा मातीच्या भांड्यात शिजविले जाते, तेव्हा त्या मातीचा स्वाद अन्नात उतरतो. धातूंच्या भांड्यांमध्ये अन्नातील पोषक तत्त्वं उडून जातात. पण, मातीच्या सच्छिद्र स्वभावामुळे त्यात पोषक तत्त्वे टिकतात.


पितळ हे तांबे व जस्तपासून बनविलेले मिश्रधातू आहे. या धातूचा वापर हळूहळू कमी होत गेला. एकतर त्याचे वजन, स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे कष्ट आणि दुसरे म्हणजे कल्हई करावी लागणे. पितळेच्या भांड्यांतील अन्न अधिक चविष्ट आणि रुचकर लागते. त्यातील जस्ताचे शरीराला अनेक क्रियांमध्ये गरज असते. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी जस्त उपयोगी आहे. तांबे हे जंतुघ्न म्हणून उत्तम काम करते. या गुणांमुळेच रात्री पाणी तांब्याच्या तांब्यात ठेवून सकाळी प्यायले जाते. अन्न शिजविण्यासाठी सहसा तांब्याचा वापर होत नाही. तसेच सोनं व चांदी या धातूंच्या भांड्यांचेही उपयोगी गुणधर्म आहेत. चांदीमुळे शरीरातली उष्णता कमी होऊन थंडावा येतो. तसेच चांदीच्या ताटात जेवल्याने (गरम जेवण) व चांदीच्या तांब्यातील पाणी प्यायल्याने मेंदू तल्लख होतोच. त्याचबरोबर डोळ्यांचे आरोग्य सुधारते व पित्तदोषही नियंत्रित ठेवण्यास मदत होते.


सोन्याचे भांडे, पात्र, ताट हे सर्वोत्तम मानले आहे. सोन्याच्या भांड्यात अन्न ठेवल्याने ते निर्तिष होते, असे आयुर्वेदात वर्णिले आहे. सोन्यामुळे शारीरिक बळ वाढते. शरीरातील सातही धातूंची पुष्टी आणि पूर्ती होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास व टिकविण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हितकर आहे. सध्याच्या घडीला सोन्याचे वळं, नाणं पाणी उकळवताना पातेल्यात घालावे. पाणी एक चतुर्थांश आटेपर्यंत आटवावे. नंतर हे पाणी चांदीच्या तांब्यात ओतावे. दिवसभराच्या वापरासाठी हे पाणी घ्यावे.

- वैद्य कीर्ती देव


या पद्धतीने, विचारपूर्वक स्वयंपाकघरातील भांडी वापरावीत. (क्रमशः)


@@AUTHORINFO_V1@@