धक्कादायक ! गुजरातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

Dr Ambedkar_1  
 
 
 
गुजरात : एकीकडे मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता गुजरातमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यामधील सिहोर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याप्रकरणी सिहोर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहेत. ज्यामुळे संपूर्ण परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणींनीही जोर धरला आहे.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत असतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सोमवारी काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा चेहरा बादलीने झाकला होता. तसेच पुतळ्याच्या शेजारी दारूच्या रिकाम्या बाटल्या ठेवल्याचा प्रकार पुढे आला आहे. हे धक्कादायक कृत्य पाहिल्यानंतर सोमवारी सकाळी आसपासच्या लोकांनी सिहोर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. सिहोर पोलिसांकडून अज्ञात व्यक्तींविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@