राष्ट्रपतींच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्यांची तुरुंगात रवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2020
Total Views |
boy edit photo of preside





मथानिया : जोधपूरमध्ये राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणाला प्रसिद्ध होण्याची हौस त्याला तुरुंगात घेऊन गेली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या फोटोची एडीटींग करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला चांगलाच फटका बसला आहे. फोटो एडीट करत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळाल्याचे आणि अभिनंदन केल्याचे सांगत त्याने फोटो शेअर केला. काही वृत्तपत्रांमध्येही हा सन्मानाचा प्रकार छापून आला. हा प्रकार जास्त वेळ चालला नाही. सायबर गुन्हे विभागाने त्याच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केले. 



जोधपुरच्या तिंवरी कस्बे येथे राहणारा राहुल राठी आपल्या फेसबूक अकाऊंटद्वारे एक फोटो पोस्ट करतो. ज्यात त्याला राष्ट्रपतींतर्फे सन्मान मिळाल्याचे दाखवण्यात आला आहे. गावकऱ्यांनी त्याला शाबासकी देण्यास सुरुवात केली. त्याला शुभेच्छा देण्यासाठी लोक स्थानिक नेते मंडळी येऊ लागली. गावातील एका व्यक्तीने मात्र हा बेबनाव ओळखला. राहुल खोटा फोटो दाखवून प्रसिद्धी मिळवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीसांत ही माहिती त्या व्यक्तीने दिली. गावातील लोक अभिनंदनासाठी पोहोचत होते, तर दुसरीकडे पोलीसांचे पथक अचानक राहुलला ताब्यात घेण्यासाठी पोहोचले. 




boy edit photo of preside




हा प्रकार काही वेळाने गावकऱ्यांच्या लक्षात आला. पोलीसांनी चौकशी केल्यानंतर त्याने हा फोटो खोटा असल्याची कबुली दिली.
यापूर्वीही त्याने अनेक सायबर गुन्हे केले आहेत, असा त्याच्यावर आरोप आहेत. वेबसाईट हॅक करणे, तसेच सोशल मी़डियाचा गैरवापर करणे, असे आरोप त्याच्यावर आहेत. यावेळी थेट राष्ट्रपतींच्या फोटोशी छेडछाड करणे त्याला महागात पडले.





boy edit photo of preside
@@AUTHORINFO_V1@@