औरंगाबादमध्ये कडक १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |
aurangabad _1  






औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलीसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये दुचाकीवरून एका पेक्षा जास्त जण प्रवास करताना दिसल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत. 



औरंगाबादमध्ये गेल्या दिवसभरात तीनशेहून जास्त रूग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६ हजार ५६८ इतकी झाली असून आत्तापर्यंत २ हजार ७८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णावाढीची साखळी रोखण्यासाठी आता पुरेपूर प्रयत्न केले जात असून कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@