आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |

PMO_1  H x W: 0



नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी मध्य प्रदेशातील रीवा स्थित आशियातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाटन करत जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, "आज रीवाने खरोखर इतिहास रचला आहे. सौर उर्जा हे केवळ आज नव्हे तर २१ व्या शतकातील ऊर्जेची गरज भागविणारा प्रमुख स्रोत ठरणार आहे. कारण सौर ऊर्जा कायमस्वरूपी, शुद्ध आणि सुरक्षित ऊर्जास्रोत आहे. "



मध्य प्रदेशातील रीवा येथे ७५०मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मध्य प्रदेश स्वच्छ व स्वस्त विजेचे केंद्र बनेल. याचा फायदा मध्यम आणि गरीब कुटुंबाना होईल. त्याचा फायदा शेतकरी व आदिवासींना होईल. आपल्या संस्कृतीत सूर्याला विशेष महत्त्व आहे. त्यांनी एका संस्कृत श्लोकाद्वारे सांगितले की, 'उपासना योग्य सूर्य देवता आम्हाला पवित्र कर.' रीवामध्येही हीच शक्ती आपण अनुभवणार आहोत. संपूर्ण देशाला आज सूर्य देवाची ही ऊर्जा जाणवत आहे.


riva_1  H x W:


सौरऊर्जा निर्मितीत भारत जगात पाचव्या स्थानावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सौर ऊर्जेच्या बाबतीत आपण जगातील पहिल्या पाच देशांमध्ये पोहोचलो आहोत. यात भारत स्वयंपूर्ण होत आहे. जेव्हा आपण स्वयंपूर्णतेबद्दल बोलतो तेव्हा अर्थव्यवस्था हा त्यातील सर्वात महत्वाचा भाग असतो. जगभरातील शास्त्रज्ञ आज संभ्रमात आहेत कि पर्यावरण रक्षण आणि उद्योगांची क्षमता वाढविणे यात समतोल कसा साधावा. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे एकमेकांना पर्याय असू शकतात हे भारताने दर्शविले आहे. वीजेवर आधारित बदलासाठी नवीन संशोधन केले जात आहे. मानवी जीवन सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत.


आत्मनिर्भरता तेव्हाच शक्य आहे जेव्हा आत्मविश्वास असेल

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आत्मनिर्भरता तेव्हाच शक्य आहे जेव्हा आत्मविश्वास असेल. गरीब कल्याण योजना यामुळेच शक्य झाली आहे. केंद्र सरकारने दीपावली व छठपर्यंत गरिबांना अन्न देण्याचे ठरविले आहे. शेवटी, पंतप्रधान म्हणाले की, सोशल डिस्टंन्स, मास्क वापरणे, २० सेकंदापर्यंत हात धुणे ही शिस्त कोठेही कमी होऊ देऊ नका. आपले जीवन खूप मौल्यवान आहे आणि कौटुंबिक जीवन देखील खूप मौल्यवान आहे. नेहमीच त्याचे अनुसरण करा. रिव्यात सुरक्षित भविष्याचा पाया घातला गेला आहे, हे काम लहान समजू नका. आपण सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि निरोगी रहा."


प्रकल्पाची क्षमता ७५० मेगावॅट इतकी आहे


रिवा येथील सौरउर्जा प्रकल्पाची क्षमता ७५० मेगावॅट इतकी आहे आणि १५९० हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या एकल सौर प्रकल्पांपैकी एक आहे. या सौर उर्जा प्रकल्पात एकूण तीन युनिट आहेत. प्रत्येक युनिट २५० मेगा वॅट्स वीज निर्मिती करीत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी ७६ टक्के वीज राज्यातील वीज व्यवस्थापन कंपनीला आणि २४% टक्के वीज दिल्ली मेट्रो प्रकल्पाला दिली जात आहे.


पर्यारणाच्या दृष्टीने महत्व
या प्रकल्पाचे महत्व म्हणजे खरेदी दर २ रुपये ९७पैसे इतका आहे, जो आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सौर प्रकल्प पाहता, रीवा सौर प्रकल्पातून दरवर्षी १५.७ लाख टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जात आहे जे २ करोड ६०लाख झाडे लावण्याइतके आहे.
@@AUTHORINFO_V1@@