मुंबईत मध्यरात्रीपासून कलम 144 लागणार !

    01-Jul-2020
Total Views |
mumbai_1  H x W




मुंबई
: मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल.




मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. अशातच लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल केल्यापासून शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा अधिक झपाटयाने वाढू लागला आहे. अनेक कार्यालये सुरू झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली आहे. मागील काही दिवसांत मुंबई पोलिसांनी हजारो वाहने जप्त केली आहेत. मात्र तरीही घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.  मुंबई पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता रात्रीच्या संचारबंदीमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं, धार्मिक स्थळी भेटणं, फिरणं यासाठी परवानगी नसेल. मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यापूर्वीच २ किमी अंतरापलिकडे जाण्यास बंदी आहे. त्यासोबतच बाहेर पडताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, चेहर्‍यावर मास्क घालणे बंधनकारक आहे.