'हिंदू धर्मातील परंपरेसोबत हा अन्याय का ?' चंद्रकांतदादा पाटलांचा सरकारला सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |

chandrakant dada patil_1&




मुंबई :
यंदाच्या वर्षी कोरोनाचा धोका पाहता राज्य सरकारने सर्व मानाच्या पालख्या या बसने पंढरपूरला रवाना होतील तसेच या पालख्यांसोबत २० वारकऱ्यांना जाण्याची मुभा देखील देण्यात आली. परंतु, या विशेष बससाठी ७०००० रुपये आकारले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी 'संतांच्या भूमीतच वारकऱ्यांवर अन्याय का ?' असा सवाल उपस्थतित करत राज्य सरकारवर सडकून टीका केली.



'२० वारकऱ्यांकडून ७० हजार रुपये घेणे हे नेमके कोणते गणित आहे ?'

याबाबत ते म्हणतात, 'पंढरपूरची वारी' हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला मोठा सांस्कृतिक वारसा. सातशे ते आठशे वर्षांची परंपरा. परंतु हे वर्ष कोरोनाच्या संकटामुळे काहीसे अपवाद ठरले. संबंधीत धोका लक्षात घेऊन यावर्षी बसने पालखी पंढरपूरला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सोबत २० वारकऱ्यांना जाण्याची परवानगीही देण्यात आली. मोठ्या मनाच्या वारकऱ्यांनी सर्वांच्या हितासाठी हे मान्य देखील केले. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या पालखी सोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडून राज्य सरकारने विशेष बसच्या नावाखाली तब्बल ७० हजार रुपये घेतले.' यामागचे राज्य सरकारचे गणित नेमके काय ? असा सवाल चंद्रकांतदादांनी उपस्थित केला.




'हिंदू धर्मातील परंपरेसोबत हा अन्याय का ? महाराष्ट्रात असं घडावं यासारखं दुर्दैव नाही.'


पुढे ते म्हणतात,"वास्तविक संतांच्या भूमीत हे विनामूल्य करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य होते परंतु विनामूल्य तर राहिले बाजूला यांनी नाशिक ते पंढरपूर या प्रवासाचे २० वारकऱ्यांकडून ७० हजार रुपये घेणे हे नेमके कोणते गणित आहे? इतर धर्मातील लोकांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी सरकारकडून नेहमीच आर्थिक सहकार्य केले जाते. त्यात काही गैर नाही परंतु मग हिंदू धर्मातील परंपरेसोबत हा अन्याय का ? आणि ते देखील महाराष्ट्रात असं घडावं यासारखं दुर्दैव नाही. मा. मुख्यमंत्री तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला ज्या धर्माने इथवर येऊन पोहचवलं त्याची हि अशी परतफेड केलीत? वारकऱ्यांना माऊली पर्यंत पोहचण्याच्या इच्छेचा देखील राज्य सरकारने बाजार मांडला अशा शब्दांत चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
@@AUTHORINFO_V1@@