लालबागच्या राजाच्या दरबारात मूर्तीऐवजी होणार माणुसकीचे दर्शन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |

Lalbaug cha raja_1 &


कोरोना संकटावर मात करण्यासाठी लालबागचा राजा मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

मुंबई : मुंबईत लालबागच्या चिंचोळ्या गल्लीमध्ये दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला तासनतास भक्तांची रांग असते. मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागचा राजा गणेशोत्सव रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा या मंडळाच्या ८७व्या वर्षी "लालबागचा राजा आरोग्य उत्सव" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोना संकट असल्यानं मंडळायाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. ११ दिवस गणपती बाप्पाची मुर्ती न बसवता, ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तसेच गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता मंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत आरोग्यसेवा करणार असल्याचे सांगितले आहे. लालबागच्या राजाची ख्याती खुप मोठी आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. पार सातासमुद्रा पल्याडाहून, देशविदेशातून लोकं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. पण यंदा हा उत्सव होणार नाही. गणेशोत्सवात लालबागमध्ये लाखो भाविक येत असतात गर्दीत कोरोनाची लागण असलेल्यांचा वावर आला तर कित्येकांना यांची लागण होऊ शकते आणि परिणामी शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो तसेच कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढू शकतो त्यामुळेच सणासुदीला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@