तामिळनाडूतील नेयवेली थर्मल प्लांटमध्ये स्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |

tamilnadu_1  H



दुर्घटनेत १७ जण जखमी; तर अद्याप मृतांबद्दल माहिती समोर नाही 


चेन्नई : तामिळनाडूतील नेयवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-२ वरील एका बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. आतापर्यंत १७ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून जखमींवर एनएलसी लिग्नाइट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेयवेली थर्मल प्लांटमध्ये कोळशापासून वीज निर्मीती करण्यात येत होती. प्लांटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्कू ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत स्थानिक प्रशासनाच्या वतीने मृतांचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. घटनास्थळी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत.


आतापर्यंत स्थानिक प्रशासनाच्या वतीने अपघातातील मृतांचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या घटनास्थळी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत. दरम्यान, आतापर्यंत स्फोटाच्या कारणांबाबत समजलेलले नाही. मात्र या अपघातात जखमींची आणि मृतांची संख्या वाढू शकते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.


दरम्यान, कंपनी ३९४० मेगाव्हॅट वीज निर्माण करते. तसेच ज्या प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. त्यामध्ये १४७० मेगाव्हॅट वीज निर्माण केली जाते. या कंपनीमध्ये १५ हजार कंत्राटी कामगारांसह जवळपास २७ हजार कर्मचारी काम करतात.


@@AUTHORINFO_V1@@