जूनचा पगार नाही आला तर नोकरी गेली म्हणून समजा - टीकटॉक कर्मचारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2020
Total Views |
tik tok_1  H x






नवी दिल्ली : केंद्र सरकारने चीनी अॅप्सवर आणलेल्या बंदीचे अनेकांनी स्वागत केले. सोशल मीडियावर याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, त्याहूनही भयंकर समस्या आता पुढे ओढावत आहेत. चीनी कंपन्यांचे अॅप्स बंद झाल्याने इथे काम करणाऱ्या अनेकांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. हा असा वर्ग होता, ज्याच्या मनात कायम चीनी अॅप्स बंद होणार याची भीती कायम होती.


टीकटॉक सीईओ केविन मेअर यांनी दिलेल्या आश्वासनात म्हटले आहे कि, आमचे कर्मचारी हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांचे हित जपणे हेच आमचे आद्य कर्तव्य असेल. आम्ही आमच्या दोन हजारांहून अनेक कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे, की काहीतरी सकारात्मक नक्की होईल, याबद्दल आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो. तसेच आमच्यातर्फे जे शक्य असेल ते आम्ही करू.


हेलोचे सीओओ यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी म्हटले की, ना आम्ही पगार कपात करणार आहोत, ना कर्मचारी कपात. हेलो अॅपच्या गुरुग्राम कार्यालयात काम करणाऱ्या दिल्लीतील एका कर्मचाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर एक खुलासा केला आहे. नोकरी जाण्याच्या भीतीत असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही सकारात्मक विचार ठेवण्याची विनंती करत आहोत. त्यांना प्रोत्साहन देत आहोत.

या कंपन्या भारतात आणखी गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहेत. मात्र, बंदीबद्दल भारत सरकारशी चर्चा करणार आहोत. लवकरच भारत सरकारतर्फे याबद्दल समाधानकारक तोडगा निघेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या काळात कुठल्याही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही, याची हमी अॅप्स घेत आहेत.

दोन हजार कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न


जगभरात प्रसिद्ध असलेल्या टीकटॉक आणि हेलो अॅपची पॅरंट कंपनी बाईट डान्स असलेल्या मुख्यालयात दोन हजारांहून अधिक कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात ९५ टक्के कामगारांना वर्क फ्रॉम होम करण्याचाी मुभा मिळाली होती.


बाईट डान्सची भारतात एकूण सात कार्यालये आहेत. गुरुग्राम वगळता मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आदी शहरांतही कर्मचारी आहेत. टीकटॉकचे जगभरात एकूण ८० कोटी युझर्स आहेत, त्यापैकी २० कोटी युझर्स भारतीय आहेत.
बाईटडान्सच्या दोन्ही अॅप्सवर बंदी आणल्यानंतर कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीची चिंता सतावत आहे. एका कार्यालयातील कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्वतःचा अनुभव सांगितला.



साधारणपणे महिनाअखेरीस आमच्या पगाराची स्लिप तयार असते. तसेच महिना संपण्यापूर्वी एक दिवस आधी पगारही होतो. या महिन्यात २९ जून रोजी सॅलरी स्लिप जनरेट झाली होती. परंतू ३० जून रोजी सॅलरीचा मेसेज आला नाही. मी बँक अकाऊंटे चेक केले तेव्हा समजले की पगार झालेलाच नाही.


माझ्या मनात असंख्या प्रश्न निर्माण होत आहेत, अॅप्सवर बंदी आणल्यानंतर आता आमच्या नोकऱ्या तर जाणार नाहीत ना. मी नवे काम पाहायला सुरुवात केली आहे. बऱ्याच ओळखीच्या मित्रांना काम शोधण्यासाठी सांगितले आहे. कंपनीकडून आश्वासन दिले जात असले तरीही नोकरी जाण्याचे संकट कायम आहे. कोरोनाच्या काळात नोकरी जाणे आणि नवी नोकरी शोधणे फारच कठीण गोष्ट आहे. मी काम करत असलेला अॅप बंद झाल्याने माझा संपूर्ण परिवार चिंतेत आहे.

१ मिनिट जाहिरातीसाठी ब्रॅण्ड द्यायचे ८० हजार


दिल्लीत राहणारी एक तरुणी टीकटॉक व्हीडिओ द्वारे लोकांना आपल्या आरोग्याबद्दल जागरुक राहण्यासाठी व्हीडिओ बनवत होती. सुरुवातीला छंद म्हणून ती काम करू लागली होती. त्यानंतर तिने नोकरी सोडून पूर्णपणे हेच काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिला व्हीडिओज् जाहीरातीसाठी विचारणा होऊ लागली. टीकटॉक बनवण्यासाठी वेळ पूरत नव्हता म्हणून तिने नोकरी सोडली. त्यामुळे जास्तीत जास्त कंपन्यांसाठी ती व्हीडिओ बनवू शकत होती.


एका व्हीडिओसाठी कंपनी २० ते ३० हजार रुपये गुंजनला देत होती. दररोज चार ते पाच कंपन्या आपल्या प्रोडक्ट प्रमोशनसाठी तिला विचारत असत. लहान कंपन्यांचा एक व्हीडिओ ५ ते १० हजार रुपयांमध्ये बनत होता. तर नाईके, वीवो, ओप्पो आणि प्युमासारखे बडे ब्रॅण्डस् तिला एका व्हीडिओसाठी ८० हजारापर्यंत पैसे द्यायचे. तिचे ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.



@@AUTHORINFO_V1@@