नागरी सहकारी बँकांचे नियंत्रण नाबार्डकडे नकोच !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
Sahakar Bharati _1 &





सहकार भारतीतर्फे एकमताने प्रस्ताव मंजूर

मुंबई : नागरी सहकारी बँकांचे पूर्णपणे नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे द्यावे, असा ठराव सहकार भारतीतर्फे रविवार दि. ७ जून रोजी पार पडलेल्या झूम कॉन्फरन्सिंगमध्ये एकमताने मांडण्यात आला. काही दिवसांपूर्वी सर्व नागरी सहकारी बँकांचे नियंत्रण नाबार्डकडे देण्याची मागणी करण्यात आली होती. सर्व सहकारी बँकांनी तशी शक्यता पूर्वीच धुडकावून लावली असल्याने नाबार्डचा नियंत्रक म्हणून प्रस्ताव सादर करणे हे दूर्दैवी असल्याचे मतही यावेळी नोंदवण्यात आले. या कॉन्फरन्सवेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी तसेच सतीश मराठे आदी मान्यवरही उपस्थित होते.
 
नागरी सहकारी बँकांवर पूर्णपणे रिझर्व्ह बँकांचे नियंत्रण असावे, यासाठी बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ मध्ये सुधारणा करावी, अशी मागणी करणारे विधेयक यापूर्वी लोकसभेत सादर करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यसभेतही विधेयक सादर करण्यात येणार आहे. संबंधित विधेयक मंजूर झाल्यानंतर बँकांसाठी व्यावसाय वृद्धी आणि ग्राहकांनाही संरक्षण मिळणार आहे. अशावेळी नाबार्डचा प्रस्ताव आणणे दुर्देवी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. नाबार्डकडे नियंत्रण देण्यासंदर्भातील प्रस्ताव सहकार भारतीतर्फे फेटाळण्यात आला असून इतर बँकींग संघटनांनीही तो फेटाळावा, असे आवाहन डॉ. उदय जोशी यांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे. 





@@AUTHORINFO_V1@@