अन्न हे पूर्ण ब्रह्म (भाग-६) जागतिक अन्नसुरक्षा दिन, २०२०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
food safety _1  



-
२०१४ पासून ‘जागतिक आरोग्य संघटने’ने FAO (Food And Agriculture Organisation of United Nations) बरोबर संयुक्त विद्यमानाने ७ जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन (म्हणजेच World Food Safety Day) साजरा करण्याचे घोषित केले आहे. असा जागतिक दिवस घोषित करण्यामागचे कारण म्हणजे, अन्नातून होणार्‍या आजारांवर, आरोग्यावर प्रतिबंधात्मक उपाय, त्याची ओळख आणि त्यावरील उपाययोजना करणे. तेव्हा, आजच्या भागात त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया...



--
म्हणजेच जो आहार, अन्नधान्य शेतातून पिकते, बाजारात येते, त्याची साठवण, त्यावर केलेली प्रक्रिया, धान्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जीएम बियाणांचा वापर, रेडी टू इट पॅकिट्स, ज्यूस, कोल्ड ड्रिंक्सचे पॅकिंग ते उपभोगल्याने त्याचे सेवन, ग्रहण करण्यापर्यंतच्या विविध पैलूंमुळे होणारी भेसळ, संपर्क इ.चा विचार यात होता. अन्नाबरोबरच पाण्याचाही दूषित असताना शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. त्याचाही विचार ‘फूड सेफ्टी’च्या अंतर्गत होतो.
 
 

1_2  H x W: 0 x

 
'World Health Safety Day'च्या अंतर्गत अन्नपदार्थ सुरक्षित कशी ठेवायची (Ensure its safety) शुद्ध, नैसर्गिक वाढ, पीक शेती करणे (Grow it safe), त्याची साठवण शुद्ध, भेसळ विरहीत करणे (Keep it safe), शुद्ध सात्विक आहार सेवन (Eat it safe) आणि प्रत्येकाने या शुद्ध, नैसर्गिक, भेसळविरहीत, अनारोग्यावर ठरणार नाही. असे अन्नधान्य सर्वांपर्यंत पोहोचवणे (Team up for safety) या सर्वांचा अंतर्भाव केला आहे.

 
 
आता भेसळ म्हटली की, धान्यात दगड, रंग इ. पटकन सुचते. पण, सध्या अनारोग्याचे मुख्य कारण प्लास्टिक आणि अ‍ॅल्युमिनिअम हे आहेत. आता तुम्ही असा विचार कराल. हे तर आपण खातच नाही. तर या गोष्टींचा आपल्याला कसा अपाय होईल? तर याचे उत्तर म्हणजे फूड पॅकिंग. भाजी आणायला घरून पिशवी नेली नाही की प्लास्टिकमधून भाजी आणणे. खानावळ, हॉटेलमधून घेताना पार्सलचे डब्बे, पिशव्यांतून आणणे. किराणा सामानही अर्धा किलो, एक किलो इ. मापात आधीच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून भरून ठेवलेले असते. बिस्किट्स, कोल्ड ड्रिंक, ताक, लस्सी इ. सगळे प्लास्टिकच्या बाटल्यांमधून असते. दुधाच्या पिशव्या प्लास्टिकया चहासुद्धा प्लास्टिकच्या कपातून प्यायला जातो. घरी साठवण प्लास्टिकच्या डब्यातून, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना प्लास्टिकच्या भांड्यांमधून गरम करणे, अशी रोजच्या जीवनातील एक ना अनेक उदाहरणे देता येतील.
 



1_1  H x W: 0 x
 
 
बर्‍याच जणांचा असा समज आहे की, गरम वस्तू प्लास्टिकमध्ये ठेवून, भरून चालत नाही. पण, अन्य साठवणीसाठी चालते. ही एक चुकीची समजूत आहे. ‘Environmental Pollution' या जर्नलमधल्या एक लेखातून असे स्पष्ट झाले आहे की, प्रत्येक व्यक्ती दिवसाला १०० Bits Microplastic चे सेवन करते. प्रत्येक एका जेवणार्‍या वेळेस आणि सरासरी हे प्रमाण ७०,००० Microplastic Bits, एका वर्षातून शरीरात प्रवेशित होते. Microplastic चा मुख्य स्रोत हा Seafood आहे. पर्यावरणातून छोटे छोटे प्लास्टिकचे कण (५ मिमी पेक्षा लहान) आपल्या पाण्यात, आहारात, परिसरात पसरतात. याने बाह्य वातावरण प्रदूषित तर होतेच. पण, शरीरात गेल्यास शरीर ते पचवू शकत नाही. त्याचा साठा होतो. विलयन प्रक्रियेतून घातक रसायने शरीरात उत्पन्न होतात आणि आरोग्यास बाधक ठरतात.
 
 
शरीरात प्लास्टिक पोहोचवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे ‘Plastic Leaching' म्हणजे प्लास्टिकमधील रासायनिक घटकांची गळती (शब्दशः अर्थ Leaking, Transfer of Chemicals यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे BPA (Bisphenol A). 'BPA' जेव्हा प्लास्टिकच्या बाटलीतील अन्न, द्रव पदार्थांच्या संपर्कात येते, तेव्हा त्यातून Styrene, Polyvinyl Chloride इ. स्रवते. यामध्ये फक्त बाटल्या आणि पिशव्याच नाहीत, तर प्लास्टिक कप, Styrofoam cup, प्लास्टिकचे चमचे, प्सास्टिकच्या प्लेट्स, स्ट्रोज इत्यादीचाही समावेश होतो. बराच काळ प्लास्टिकच्या संपर्कात राहिल्याने, त्यातील ‘लिचिंग’ ही प्रक्रिया सुरू होते. BPA या रसायनाचे कार्य शरीरात जाऊन अंतस्रावी ग्रंथींचे कार्य बिघडवणे हे आहे. (Endocrinal, Hormonac Disruption) जास्त प्रमाणात प्लास्टिक लिचिंग झाले, तर खालील व्याधी उद्भवू शकतात- स्थौल्य, अस्थमा, कर्करोग, हृदयरोग इ. ‘Environmental Health Perspective'च्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, प्लास्टिक (BPA असलेले) आणि BPA free plastic दोन्हीमधून) एस्ट्रोजेनच्या कार्यासमान कार्य करू लागते. Hormonal Imbalance हल्ली जो बघण्यात येतो, त्याचे मुख्यतः कारण आहारापेक्षा आहारातील प्लास्टिक हे आहे.
 
 
प्लास्चिक लिचिंग सामान्य वातावरणात, रूम ट्रेप्रेचर तर होतेच, पण उन्हामुळे डिशवॉशरमध्ये गरम पाण्यात धुताना मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजवताना इ. म्हणजे उष्ण स्पर्शाशी आल्यावर प्लास्टिक लिचिंगचे प्रमाण वाढते. प्लास्चिक लिचिंगचा परिणाम गर्भात वाढणार्‍या बाळाच्या मेंदूवर आणि प्रोस्टट ग्रंथीवर होतो, असेही संशोधनातून सिद्ध झाले आहे. या BPA मुळे डायबिटीसही होऊ शकतो. त्याचबरोबर अन्य ‘Lifestyle Disorders'चे कारण कुठे तरी प्लास्टिकमध्ये दडलंय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
 
लहानपणापासून प्लास्टिकचा भरपूर वापर होतो. दुधाच्या बाटल्या, प्लास्टिक, चमचा, भांडे सर्व प्लास्टिकचे असते. दात येताना टीथर जे चावले जाते, तेही प्लास्टिक आणि रबर अशा गोष्टींपासून बनविलेले असते. आपण तर सकाळ ते रात्र आपला दिनक्रम बघितला, तर प्लास्टिक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे, असे लक्षात येईल. पण, ही सवय मोडणे गरजेचे आहे. फायद्यापेक्षा त्याचे तोटेच अधिक आहेत. लहान मुलांमध्ये चांदीचे ताट, वाटी, चमचा वापरावा. बाटलीची सवय न लावता चमचा, वाटीने दूध पाजावे. पाण्याची बाटली, शाळेचे डब्बे, मायक्रोव्हेवमधील भांडी, साठवणीचे डबे इ. सर्वांतून प्लास्टिक नाहीसे करावे. फळे, भाज्या व अन्न जिन्नसांसाठी बाजारात कापडी पिशव्या घेऊन जायची सवय लावावी. प्लास्टिकची जशी समुद्रतटावर, खोल समुद्रात, तलावाशी इ. साठवण होऊन पर्यावरणासाठी ते बाधक ठरते, तसेच शरीरात ही साठवण होऊन आरोग्यास बाधकच आहे.
 
 
- वैद्य कीर्ती देव
@@AUTHORINFO_V1@@