कर्करोगाबद्दल जनजागृती करणार्‍या 'आरसा’ लघुपटाचे सर्वत्र कौतुक!

    07-Jun-2020
Total Views |

Aarsa_1  H x W:


कर्करोगाबद्दल जनजागृती करणार्‍या 'आरसा' लघुपटाने पटकावले पाच पुरस्कार! 


मुंबई : सध्या ‘लॉकडाऊन’मुळे विविध चित्रपट महोत्सव ऑनलाइन होत आहेत. त्यातून अनेक नवे विषय, नवीन प्रवाह आणि नवी मांडणी समोर येत आहे. कर्करोगविषयक सामाजिक प्रबोधनात्मक निर्मिती केलेल्या 'आरसा' या सामाजिक लघुपटाला तामिळनाडू येथील ‘कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटासह एकूण पाच पुरस्कार मिळाले आहेत.


‘सर्वोत्कृष्ट लघुपट-आरसा’, ‘सर्वोत्कृष्ट लेखन-आशिष निनगुरकर’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-श्वेता पगार’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन-गणेश मोडक’ व ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट-आरसा’ असे एकूण पाच पुरस्कार या लघुपटाला मिळाले आहेत. अनेक दर्जेदार लघुपटांमधून आशिष निनगुनकर लिखित ‘आरसा’ या लघुपटाने परीक्षकांची विशेष पसंती मिळवली. ‘आरसा’ हा लघुपट कर्करोगाबद्दल जनजागृती करणारा आहे.


‘आरसा’ या लघुपटाचे दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले असून संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात श्वेता पगार, चैत्रा भुजबळ, संकेत कश्यप, गीतांजली कांबळी व डॉ. स्मिता कासार यांनी भूमिका केल्या आहेत. आशिष निनगुरकर यांनी या लघुपटाचे लेखन केले असून ’काव्या ड्रीम मूव्हीज’ व किरण निनगुरकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ‘कोइंबतूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘आरसा’ या लघुपटाला एकूण पाच पुरस्कार मिळाल्याने विशेष कौतुक होत आहे. या लघुपटासाठी निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे, स्वप्निल निंबाळकर, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू, अभिषेक लगस, सुनील जाधव, अजित वसंत पवार यांनी काम केले. तर या लघुपटाचे सहनिर्माते अशोक कुंदप व आशा कुंदप हे आहेत.