पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात ; बहुतांश भाग पाण्याखाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2020
Total Views |

mumbai_1  H x W
मुंबई : सध्या मुंबईवर कोरोनाचे सावट असले तरीही मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाने सुरुवात केली आहे. ४ तारखेला आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका जरी टळला असला तरी पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होत असल्याचे चित्र पहिल्याच पावसात दिसून येत आहे. शनिवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पालिकेचे नाले सफाईचे दावी खोटे ठरले आहेत.
 
 
मुंबईतील दादर, माटुंगा, सायन, कुर्ला भागात बोरीवलीसह बहुतांश भागात शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. तर गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडत होता. ठाणे, डोंबिवली परिसरातही शनिवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. तर भिवंडी परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील कल्याण रस्त्यावर पाणी साचले होते.
 
 
३ आणि ४ तारखेला आलेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला चांगलाच बसला. मुंबईला फटका बसला नसला तरीही पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले होते. विक्रोळी सह इतर काही भागांमध्ये गटारांमधील पाणी रस्त्यावर येऊन सर्व रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पहायला मिळाले. यावरून मुंबई पालिकेने केलेले सफाईचे दावे खोटे पडले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@