वूहानमधील शेवटचे ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |

vuhan_1  H x W:


बीजिंग :
चीनमधील कोरोना विषाणू संसर्गाच्या केंद्रस्थानी असलेल्या वुहानमधील संक्रमणाचे शेवटचे तीन रुग्णही कोरोनमुक्त होत हॉस्पिटलमधून बाहेर पडले आहेत. शहरातील एक कोटी लोकांची तपासणी केल्यावर आतापर्यंत शहरात एकही नवीन संसर्ग झाल्याचे आढळले नाही. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की बाहेरून आलेल्या पाच लोकांमध्ये संसर्ग असल्याची घटना घडली आहे. त्यापैकी चार जण शांघायमधील असून एक सिचुआन प्रांतामधील आहे.


गुरुवारी लक्षणे न दिसणारी तीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यानंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या २९७ वर गेली आहे. हे सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. गुरुवारपर्यंत देशात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ८३,०२७ झाली असून त्यापैकी ६६रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७८,३२७ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तसेच ४,६३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी वुहानमध्ये कोरोनाबाधित शेवटचे तीन रुग्णही बरे झाले व त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सरकारी पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार कळते. तथापि, वुहानमध्ये बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार अद्याप २४५ लोक संक्रमित आहेत परंतु त्यांच्यात संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@