हत्तीणीला फटाके दिले, गाईला खायला दिला बॉम्ब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |
COW _1  H x W:



हिमाचल : केरळमध्ये गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी दिलेले अननस खायाला दिल्याच्या घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये एका गाईला बॉम्ब खायला देण्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. गोरक्षेचा दाखला आपल्या देशात दिला जातो तिथेच आता लोक गाभण गाईला विस्फोटक खायला देत आहेत. 



गुरदयाल सिंह यांनी आपल्या गाईसोबत व्हीडिओ शेअर करत एकावर आरोप केला आहे. संबंधित व्यक्ती त्याच्या शेजारीच राहतो. गावातील बड्या व्यक्तींची त्याला साथ असल्याने त्याचे कुणीही वाकडं करू शकत नाही, अशी व्यथाही त्याने या व्हीडिओमध्ये मांडली आहे. दरम्यान, ही घटना कधीची आहे याबद्दल स्पष्टता झालेली नाही. गायीचा तोंड या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाले आहे. काही दिवसांतच ती वासराला जन्म देणार होती, त्यापूर्वी हा प्रकार घडला असे संबंधित व्यक्ती सांगत आहे 



काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका हत्तीणीला अननसात फटाके भरून दिल्याने तिच्या तोंडाला जखमा झाल्या होत्या. तीन दिवस नदीत उभी राहून तिने अखेर जलसमाधी घेतली. या घटनेबद्दल देशभातून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मानव आणि प्राणी संघर्षाचा मुद्दा पुन्हा उफाळून आला आहे.




@@AUTHORINFO_V1@@