भारतात 'गुगल'-'अॅमेझॉन'ही करणार मोठी गुंतवणूक?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |
Facebook_1  H x

 
 


जिओ-फेसबुक भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांना सतावतेय 'ही' चिंता !


अर्थभारत डेस्क : रिलायन्स जिओ आणि फेसबूकच्या करारानंतर गुगल आणि अॅमेझॉन कंपन्यांना फिअर ऑफ मिसिंग आऊट (फोमो) म्हणजेच पिछाडीवर राहण्याची भीती सतावत आहे. अमेरिकन फायनान्शिअल सर्व्हीस कंपनी बोफो सिक्युरीटीजच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. या करारामुळे फेसबूक गुगलवर प्रभाव टाकू शकते, अशी दाट शक्यता आहे. भारतात जाहिरात क्षेत्रामध्ये गुगलला टक्कर देणारी फेसबूक ही एकमेव बलाढ्य कंपनी आहे. रिलायन्स समुह आपल्या रिटेल क्षेत्रात अॅमेझॉनला टक्कर देऊ शकते, अशीही शक्यता आहे.
 

 
 
गुगल अॅमेझॉनला संधी निसटून जाण्याची भीती
 
 
अहवालात नमूद केल्यानुसार येणाऱ्या जागल्यांचा विचार केल्यास गूगल आणि अॅमेझॉन दोन्ही कंपन्यांना बाजारातील संधी निसटण्याची भीती (फोमो) आहे. फेसबूकने नुकताच रिलायन्स जिओचा ९.९९ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. त्यानंतर काही प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये असे म्हटले आहे की, एअरटेल आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्यांमध्ये अॅमेझॉन आणि गुगल गुंतवणूकीसाठी इच्छुक असू शकतात. दरम्यान, रिलायन्स जिओ आणि फेसबूकतर्फे कुठल्या व्यावसायिक मॉडेलवर काम करणार आहे ते अद्याप स्पष्ट केलेले नाही.
 
 


गुगल देशातील सर्वात दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोन आयडीयामध्ये पाच टक्के गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे एअरटेलमध्ये अॅमेझॉन २ अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. फेसबुक, अॅमेझॉन आणि गूगलसाठी भारतीय बाजारपेठ महत्वपूर्ण मानली जाते. भारत इंटरनेटच्या दुनियेत झपाट्याने विकास करणारा देश आहे. सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ असलेल्या भारतात ६५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. ६.६ टक्के लोक ब्रॉडबॅण्डचा वापर करत आहेत. या दोन्ही जागतिक कंपन्या भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांशी भागीदारी करतील तर डिजिटल क्षेत्रात आमुलाग्र बदल नोंदवले जातील.
 


 
इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणे हे प्रमुख ध्येय असणार आहे. गुगलला अॅपल आणि अन्य टेलिकॉम डिव्हाईसपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत. या कंपन्या भारतात गुंतवणूक करतात तर देशात ५-जी नेटवर्कचा विस्तार वेगाने होऊ शकतो. भारतात डिजिटल मंचावर फेसबूक आणि गुगलची एकमेकांना असलेली स्पर्धा ही ग्राहकांच्या फायदेशीर ठरू शकते.


@@AUTHORINFO_V1@@