रुग्ण वाचवा, मुंबईकर वाचवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |
BJP_1  H x W: 0

मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर भाजपचे मूक आंदोलन

मुंबई : मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या, उपचारासाठी प्रतीक्षा करणारे रुग्ण आणि उपचार न मिळाल्याने मृत्यू पावणारे रुग्ण अशा एकूणच ढासळत्या आरोग्य सेवेबाबत मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर मूक निदर्शने करत रुग्ण वाचवा, मुंबईकर वाचवा अशी हाक दिली. दरम्यान आयुक्तांना खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याचे आणि याला बिलंब लावणाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.


मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट तसेच अन्य वरिष्ठ नगरसेवक यांनी मुंबईच्या महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी/मास्क बांधून एक तास मूक धरणे आंदोलन केले. करोनामुळे त्रस्त मुंबईकर रुग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून आजपर्यंत शेकडो गंभीर रुग्णांची प्राणज्योत मालवली आहे.


महाराष्ट्र शासनाकडून आदेश (२१ मे २०२०) येऊन १४ दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्यात आले नाहीत. परिणामी साध्या बेड्स, अतिदक्षता-व्हेंटिलेटर बेड्स मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेकांना उपचार मिळत नाही. उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासठी मूक धरणे आंदोलन केल्याचे शिंदे यांनी सांगितले.


भाजपने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी, शासन, प्रशासनाने अद्याप खासगी रुग्णालयातील वैद्यकीय बेडस ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे कित्येक करोनाग्रस्त मुंबईकरांची हालअपेष्टा सुरू आहे. त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा प्रश्नही शिंदे यांनी केला.


या धरणे आंदोलनात नगरसेवक अतुल शाह, नगरसेविका उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना, दक्षा पटेल, ज्योती अळवणी, राजश्री शिरवाडकर, नेहल शाह, नगरसेवक कमलेश यादव, अभिजित सामंत, सुनील यादव, अॅड. मकरंद नार्वेकर, सुषम सावंत, अनीस मकवानी सहभागी झाले होते.

भाजपच्या प्रमुख मागण्या

मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के म्हणजेच १६,००० बेड्सबाबत महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी. हे बेड्स २४ तासांत ताब्यात घ्यावेत आणी महापालिका व खासगी रुग्णालयातील सर्व उपलब्ध बेड्सची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी तसेच हा डॅशबोर्ड मोबाइल अॅपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा. खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे, या भाजपच्या प्रमुख मागण्या होत्या. तसेच करोनाग्रस्त रुग्णांप्रति महापालिकेची संवेदनहीनता समोर आणावी आणि सत्ताधाऱ्यांना जागे करावे यासाठीही भाजप नगरसेवक गटाने मूक धरणे आंदोलन केले.


@@AUTHORINFO_V1@@