'व्हेंटीलेटर'च्या तुटवड्याला पर्याय निर्माण करणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020   
Total Views |
Respirator_1  H
 
 
कोरोना योद्धा असलेल्या डॉ. चित्तरंजन भावे यांचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. ज्या डॉक्टराने स्वतःला कोरोनाचा धोका आहे, हे माहिती असूनही रुग्णसेवा केली त्यांनाच वेळीच उपचार मिळणे अशक्य होऊन बसले. ही घटना कुठल्या खेड्यापाड्यातली नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईतलीच.. व्हेंटीलेटर किंवा अन्य मेडिकल क्षेत्रातील उद्योगांना पर्याय काय असू शकतो याबद्दल यशश्री उद्योग समुहाच्या यशवंत इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक आणि व्हेंटीलेटरला तात्पुरता पर्याय अशा 'रेस्पिरेटर'ची निर्मिती करणारे अविनाश मुंडे यांनी दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेली खास मुलाखत. 
 

रेस्पिरेटर म्हणजे काय ? तुम्ही बनवलेले यंत्र नेमकी कोणत्या स्वरूपाचे आहे ? 
हे यंत्र कुत्रिम स्वशोस्वासासाठी उपयोगी पडणारे यंत्र होय आणि हे एक छोटे घटक आहे. व्हेंटीलेटरवर चढवेपर्यंत रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात श्वास घेण्यासाठी याचा पर्याय म्हणून वापर करता येतो. 
 
रेस्पिरेटर बनवण्याची कल्पना कशी सुचली, हे बनवण्यास किती वेळ लागला ?
कोरोनाच्या काळात श्वसनाचे यंत्र महत्व भरपूर आहे. सध्या बाजारपेठेत त्याची उणीव भासत आहे. वास्तविक परिस्थितीत व्हेंटीलेटरची निर्मिती भारतात कमी प्रमाणात आहे. जगातही इतर देशांना व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत आहे. जागतिक पातळीवर व्हेंटिलेटरची मागणी जास्त आहे. तसेच उपलब्धताही कमी प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन व्हेंटीलेटर बनवण्याची कल्पना सुचली. त्यानुसार त्याची रचना करू प्रत्यक्ष उत्पादन करण्यास सध्याच्या स्थितीत आठ ते दहा दिवसात पूर्ण स्वरूपात तयार झाले .
 
उत्पादन तयार करताना प्रमुख ध्येय कोणते होते ?
वैद्यकिय क्षेत्रात प्रामुख्याने कोरोनाबाधित रुगणांसाठी कमीतकमी किंमतीत व उत्तम दर्जाचे वैद्यकिय क्षेत्रात मदत व्हावी. या दृष्टीने या उपकरणाची निर्मिती आम्ही केली आहे.
 
हे मॉडेल तुम्ही सरकारी किंवा अन्य कुठल्या वैद्यकीय संस्थेकडे सादर केले आहे का ?
या संदर्भात शासकीय परवान्यासाठी सरकारकडे अर्ज सादर केला आहे. त्या प्रतीक्षेत सध्या आहोत. सरकारची "इन्व्हेस्ट इंडिया' या नव्या उपक्रम पानावर सुद्धा 'रेस्पिरेटर'ची माहिती वेब पेज वर तपशील भरला आहे.
 
जर मागणी आली तर तुम्ही किती क्षमतेने उत्पादन घेऊ शकता ?
शासकीय परवाना प्राप्त झाल्या नंतर आम्ही दर दिवसाखेर ६ ते ७ नग उत्पादन आत्ताच्या घडीला करू शकतो. तसेच गरज भासल्यास जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न राहील.
 
या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत ?
प्रशिक्षित कामगार व मुबलक भांडवल आणि शासनाचे नवीन उद्योगधंद्याला चालना देणाऱ्या योजनांची नितांत गरज आहे.
 
यशश्री उद्योग समूहाचे स्वरूप नेमके कसे आहे, रोबोट इंटीग्रेटेड प्रोग्राम म्हणजे काय ? 
यशश्री उद्योग समूह हा एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम काम करणारी ग्रुप आहे. यात दुचाकी , तीनचाकी , चारचाकी वाहने व इंजिनरींग डिपार्टमेंटमध्ये दोन संथा आहेत एक "ट्रेजन" ही पिव्होट पिन व रनगाडयांची चैन बनविली जाते आणि येशवंत इंदुस्रीइज मध्ये नॉचिंग मशीन, रोबोटिक्स , ऑटोमेशन ,स्पेसिअल परपुज मशीन,टूल्स आणि नव्याने चालू केलेले उत्पादन पाईप बेन्डडींग ची मशीन व अन्य वस्तू उत्पादन करणारी यशश्री समूह आहे. रोबोट इंटीग्रेशन म्हणजे स्वयंचलित वेल्डींग करणारी यंत्रणा म्हणजे रोबोटिक इंटीग्रेशन आहे, ह्यात कमी मनुष्यबळ वापरून उत्कृष्ट आणि कमी वेळेत जास्त चांगल्या दर्जाचे उत्पादन करू शकतो.
 
कोरोनामुळे या व्यवसायात लाभलेल्या संधी आणि तोटे काय आहेत ?
 रेस्पिरेटर बनविणे ही आम्हास लाभलेली संधीच आहे. जर तोटा म्हणून विचार केला तर चालू असलेले काम व कंपनी बंद ठेवण्याचे बंधनकारक निर्णय त्यामुळे चालू काम हातातील पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या मागणीत घट सर्व प्रकारे दिसून येत आहे, येणारे पैसे व भांडवल अडकून राहत आहे व कार्य क्षमता मंदावली आणि काम, वेळ, मागणी, पैसे, ह्यात खूप आंतर पडले आहे आणि ओव्हरहेड खर्च चालू आहेत.
 
 
आंतरराट्रीय बाजारात या उत्पादनाची मागणी आहे का ?
नक्कीच आंतरराट्रीय बाजार पेठेत ह्या उत्पादनाची अत्यन्त गरज आहे कारण काही भागात जसे आफ्रिका,नायजेरिया, नुयोर्क, ह्या देशात कमतरता आहे जशी सगळीकडे आहे तशी एक वृत्तपत्रात वाचनात आले कि, अमेरिकेत जर ९.६०.००० कोरोनाबाधित रुग्ण असतील मग एवढी रेस्पिरेटरची मागणी (गरज) भासू शकते आणि त्याच्या बदल्यात फक्त २ लाख रेस्पिरेटर उपलब्ध आहेत. ही गरज भागविण्यासाठी उत्पादन क्षमता असणे गरजेचे आहे.
 
 
अन्य कुठल्याही क्षेत्र रोबोट काळाची गरज बनली आहे ? या संधीकडे तुम्ही कसे पाहता ?
 येणारी मागणी आणि उत्पादक म्हणून उत्पादन करून देण्याची गती स्वयंचलित रोबोटमुळे वाढते. कामाचे विभाजन आठवडी सात दिवसात विभागून दार दिवसा अखेर निश्चित केलेली संख्या आपण पूर्ण पणे घेऊ शकतो. पुढचे येणारे इंडस्ट्री ४.० हे युग इंटीग्रेटेड आणि स्कील्ड कामाची मागणी करणारे असणार आहे. भविष्यात आर्टीफिशल इंटेलिजन्सचीही गरज भासणार आहे. रोबोटचा वापर म्हणजे अचूक काम आणि योग्य पर्याय देणारी यंत्रणा होय. त्यामुळे पूर्ण आत्मा विस्वासाने आणि सकारात्मक दृष्टीने मी ह्या यंत्रानेकदे पाहतो व वेगवेगळ्या उत्पन / घटक बनवून मार्केट मध्ये आणण्यास सुसज्ज आहोत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@