'कोव्हिड योद्धे' पोलीसांसाठी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020
Total Views |

art of living_1 &nbs




मुंबई :
कोरोनाच्या या संकटात संपूर्ण पोलीसदल कोरोनायोध्ये होत रात्रंदिवस कुटूंबाची पर्वा न करता काम करीत आहेत. त्यामूळे त्यांना मानसिक शांतता, प्रसन्नता व आत्मविश्वास वाढावा यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढावी याकरिता 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते जगत्गुरू श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने पोलीसांकरिता विनामूल्य 'ध्यानधारणा' आणि 'श्वास' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही चार दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा फक्त पोलिसांसाठीच असणार आहे.




यामध्ये, सुदर्शन क्रिया म्हणजेच, योगा प्राणायाम, ध्यान,आत्मविश्वास जागृत करणे, मानसिक शांतता, राेगप्रतिकारक्षमता वाढविणे, मनाची एकाग्रता आणि ऊर्जेत वाढ यांसारख्या साधनेचा समावेश समावेश असणार आहे. झूम अँपद्वारे या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगने केले आहे. हे शिबीर चार सत्रात होणार असून पहिली दोन सत्र ९ जून ते १२ जून रोजी सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ८ ते १० यावेळेत होईल. तर दुसरे दोन सत्र १३ जून ते १६ जून दरम्यान सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ८ ते १० यावेळेत असेल. याशिबिरासाठी मर्यादित जागा असल्यामुळे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.


प्रतिभा ८१६९२२२५३०
रोहिणी - ९७६९०५३०३०
देवयानी- ९०९६०२६२४६
स्वाती - ९५९४६३५१११

नोंदणीसाठी पुढील लिंकवर क्लिक करावे :


९-१२ जून सकाळसाठी रजिस्ट्रेशन लिंक :

९-१२ जून संध्याकाळसाठी रजिस्ट्रेशन लिंक :

१३-१६ जून सकाळसाठी रजिस्ट्रेशन लिंक :


https://bit.ly/3eR959l

१३-१६ जून संध्याकाळसाठी रजिस्ट्रेशन लिंक :


https://bit.ly/2XRq1W4
@@AUTHORINFO_V1@@