अनलॉक २ : ८० कोटी नागरिकांना आणखी ५ महिने मोफत धान्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2020
Total Views |

PM Modi_1  H x
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ३० जूनला अनलॉक २ ची घोषणा केली. चीनसोबत चाललेला संघर्ष, कोरोनाशी झुंज अशा अनेक गोष्टींबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. पुढील ५ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देणार अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मान्सून काळात कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम, तसेच जुलैपासून चालू होणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
“वेळेस लॉकडाऊन केल्यामुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही.” असेही पंतप्रधानांनी निरखून सांगितले. पुढे ते म्हणाले की, “आपण करोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, कंटेटमेन्ट झोनची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला नियम न पाळणाऱ्या लोकांना रोखावे लागेल आणि त्यांना नियमांचे महत्त्व समजावून द्यावे लागेल.” असेही म्हणाले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@