चीनी उत्पादनांवर बहिष्कार केवळ सोशल मीडियावरच ! ग्राहकांना दुसरा पर्यायच नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2020
Total Views |
boycott _1  H x 



नवी दिल्ली : ऑनलाईन आणि ऑफलाईन वस्तू विकत घेत असताना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम जरी सुरू झाली असली तरीही अद्याप बाजारावर त्याचा फारसा फरक जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या सवयीत अजूनही कुठला फरक पडला नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. ई-कॉमर्स मंच असलेल्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर व्होकल फॉर लोकल या अभियानाला पाठींबा दिला जात आहे. सध्या भारतीय उत्पादनांना चालना देण्याचा प्रयत्न दोन्ही साईट्स करत आहेत.
ग्राहकांकडे पर्यायच नाही. 


मोबाईल खरेदी करताना पर्याय कोणते ? 
विक्रेत्यांच्या पते चीनी उत्पादने बंद करणे सहज शक्य आहे. मात्र, जेव्हा स्मार्टफोन्स खरेदी करण्याची वेळ येते, अन्य इलेक्ट्रोनिक उत्पादने खरेदी करण्याची वेळ येते त्यावेळी ग्राहकांकडे भारतीय उत्पादनांमध्ये वेगळा पर्याय उपलब्ध राहत नाही. त्यामुळे चीनी उत्पादन असले तरीही ग्राहक त्याच वस्तू खरेदी करतात. विक्रेत्यांच्या मते, चीनी उत्पादनांविरोधात मोहिम डिजिटल व्यासपीठावर शक्य आहे मात्र, प्रत्यक्षात तसे वर्तन ग्राहकांचे दिसत नाही. 


स्वस्त असल्याने खरेदी
एका विक्रेत्याच्या मते, भारतात १० पेक्षा नऊ ग्राहक चीनी मोबाईल वापरणे पसंत करतात. तुलनेने स्वस्त आणि आकर्षक असल्याने ग्राहकांचा ओढा याच उत्पादनांकडे असतो. कोरोनाच्या काळात बरेच जण कमी खर्च करत असल्यानेही चीनी उत्पादने विकत घेण्याकडे साऱ्यांचा ओढा आहे. सरासरी भारतीय ग्राहक मोबाईल विकत घेत असताना १५ हजार रुपयांवर खर्च करू इच्छित नाहीत. अन्य देशांतील उत्पादनांच्या किंमतीही अधिक असल्याने तसे करणे शक्य नाही.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर काहीच परिणाम नाही
बॉयकॉट चीनी उत्पादनांची मोहीम जरी राबवली जात असली तरीही ऑनलाईन रिटेल कंपन्यांच्या मते व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही, दरम्यान, सध्या भारतातील विरोध लक्षात घेऊन दोन्ही कंपन्यांनी विक्रीची रणनिती बदलली आहे. दोन्ही कंपन्यांनी भारतातील किरकोळ आणि लघू उद्योगांना या मंचावर आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


चीनी उत्पादनांबद्दल रोष कायम
कोरोना महामारीच्या फैलावानंतर चीनला सध्या जगाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. लडाखमध्ये चीनने ज्या प्रकारे कुरापती सुरू केल्या आहेत. त्यानुसार तिथले शिक्षक सोनम वांगचुक यांनी चीनी उत्पादनांवर बहीष्काराची मागणी केली आहे. चीनी आपल्याला वस्तू विकून त्यातून मिळालेला नफा आपल्याच देशाविरोधात सैनिकांविरोधात लढण्यासाठी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले होते.


स्थानिक उद्योगधंद्यांना प्राधान्य देण्याची गरज
दिल्लीतील इलेक्ट्रिक टेडर्स एसोसिएशने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीतही काही सत्य उघडकीस आले आहे. अनेकदा 
ग्राहक चीनी वस्तूंवरच अवलंबून असतात. सध्या कोरोनामुळे तिथे काही मागणी दिसत नाही. मात्र, कोरोनानंतरही चीनी वस्तूंची मागणी सर्वात जास्त असेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भारतात स्थानिक उत्पादन, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन न दिल्याचा हा परिणाम आहे, असेही ते म्हणाले.





@@AUTHORINFO_V1@@